Aman Jaiswal Death : धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतुन चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता अमन जयस्वाल (Aman Jaiswal) याचा रस्ते अपघातात निधन झाला आहे. अमनने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी जगातून निरोप घेतला आहे.
मीडिया रिपोर्टसनुसार,धरतीपुत्र नंदिनी (Dhartiputra Nandini) मालिकेचे लेखक धीरज मिश्रा यांनी अमनच्या निधनाची पुष्टी केली आहे. अमन ऑडिशनसाठी जात होता आणि त्याच दरम्यान जोगेश्वरी हायवेवर त्याच्या बाईकला एका ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता मात्र अपघाताच्या अर्ध्या तासानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती धरतीपुत्र नंदिनी मालिकेचे लेखक धीरज मिश्रा यांनी दिली आहे.
Aman Jaiswal Death Update
तर दुसरीकडे अमनचा मित्र अभिनेश मिश्रा याने माध्यमांशी बोलताना, अपघाताची माहिती मिळताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला. अमन ऑडिशनसाठी स्क्रीन टेस्ट शूट करण्यासाठी सेटवर जात होता.मात्र जोगेश्वरी हायवेवर त्याच्या बाईकला एका ट्रकने धडक दिल्याने त्याचा अपघात झाला आणि नंतर निधन झाला असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना अभिनेश मिश्रा याने दिली.
महत्वाच्या बातम्या :