Share

पुण्यात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर; भाजपचं टेन्शन वाढवणारी ‘ती’ बातमी!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड! अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र येत जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात भाजपसोबत असूनही पुण्यात दादांनी ताईंना साथ दिल्याने चर्चांना उधाण.

Published On: 

Ajit pawar supriya sule

🕒 1 min read

पुणे – राजकारणात कायम कुणीच कुणाचा मित्र नसतो आणि कुणीच शत्रू नसतो, हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय; पण पुण्यात जे घडलंय ते पाहून खुद्द भाजपलाही घाम फुटला असेल, यात शंका नाही! राज्यात सत्तेच्या सारीपाटावर भाजपसोबत सलोखा राखणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात मात्र वेगळ्याच भूमिकेत दिसले आहेत.

झालं असं की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचं रणांगण तापलं आहे. या रणधुमाळीत आज एक असं चित्र दिसलं ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) चक्क एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले! निमित्त होतं दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संयुक्त जाहीरनाम्याचं. यावेळी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे देखील उपस्थित होते.

महत्त्वाचं म्हणजे, राज्याच्या राजकारणात अजितदादा भाजप आणि शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसले असले तरी, पुण्यात मात्र त्यांनी ‘काकांशी’ असलेली नाळ तोडलेली नाही. सुरुवातीला चर्चा होती की अजितदादा भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण आता दोन्ही राष्ट्रवादी गट (अजित पवार गट आणि शरद पवार गट) भाजपविरोधात एकत्र शड्डू ठोकून उभे राहिले आहेत.

जाहीरनामा वाचताना अजित पवारांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘प्रदूषणमुक्त पुणे’ आणि ‘नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा’ ही दोन वचने देण्यात आली आहेत. इतकंच नाही तर, शहरात पाण्याच्या उंच टाक्या उभारणे, नवीन शाळांना मान्यता आणि झोपडपट्टी पुनर्वसन या मुद्द्यांवर त्यांनी विशेष जोर दिला आहे.

यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही विरोधकांना चिमटा काढला. त्या म्हणाल्या, “अजितदादा आणि माझे कौटुंबिक संबंध कधीच दुरावले नाहीत आणि दुरावणारही नाहीत. आमच्यात राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत.” पण स्थानिक निवडणुकांमध्ये सोयीचे राजकारण आणि युती होतच असते, असे संकेतही त्यांनी दिले.

कारण राज्यात भाजपसोबत आणि पुण्यात भाजपविरोधात, ही अजित पवारांची दुहेरी चाल मतदारांना किती रुचते आणि पुण्याच्या सत्तेची चावी कुणाकडे जाते, हे पाहणं थरारक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)