Share

Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर

Brahman Bhushan Puraskar Prashant Damle | पुणे : काल ( 2मे )ला अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जातो. याबाबत नियतकालिकांचे  मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी माहिती दिली आहे. यापूर्वी … Read more

Published On: 

Brahman Bhushan Puraskar Prashant Damle | पुणे : काल ( 2मे )ला अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जातो. याबाबत नियतकालिकांचे  मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी माहिती दिली आहे. यापूर्वी 2022 ला देखील हा पुरस्कार अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांना मिळाला होता तर आता प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.

ब्राह्मण भूषण पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर 

प्रशांत दामले यांनी 1983 साली ‘टूरटूर’ या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल होत. तसचं त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात झाली. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. तर त्यांनी व्यावसायिक नाटकांच्या 12 हजार पाचशेंहून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केलेले आहे. याचप्रमाणे त्यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार देखील मिळाला असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी मिळाली आहे. त्यांना आता ब्राह्मण भूषण हा पुरस्कार जाहीर झाला असुन त्यामध्ये मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असं पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभामध्ये प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले हे प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

Brahmin Bhushan Award given to actor Prashant Damle

दरम्यान, हा पुरस्कार सोहळा 6 मे 2023 रोजी (शनिवार)  5.30 वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथील  मॉडर्न कॉलेज सभागृहात पार पडणार आहे. तसचं या सोहळ्यात इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार साहित्यिक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना, डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार सौ. मानसी बडवे यांना रोख बक्षिस, शाल  आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण चितळे (अध्यक्ष, महाराष्ट्र चित्पावन संघ) तर डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. याचप्रमाणे ब्राह्मण भूषण पुरस्काराने यापूर्वी श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर (2013), अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी (2014), एअर मार्शल भूषण गोखले (2015), पं. वसंतराव गाडगीळ (2016), पितांबरीचे श्री. रविंद्र प्रभुदेसाई (2017),  पौरोहित्यांचे संघटन करणाऱ्या श्रीसद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत कुलकर्णी (2018), सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे (2019) आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे (2022) यांना आले आहे. यामुळे कलाकारांनी त्यांचं कौतुक करत पुढील प्रवासासाठी शुभेच्या देखील दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही