Share

‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!

‘धुरंधर’ सिनेमाच्या यशावर अभिजीत बिचुकलेची (Abhijeet Bichukale) खोचक प्रतिक्रिया. “५० दिवसांत लोक विसरतील”, म्हणत स्वतःलाच घोषित केलं महाराष्ट्राचा खरा धुरंधर!

Published On: 

Abhijeet Bichukale on Dhurandhar

🕒 1 min read

सातारा– रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय, सगळीकडे याच सिनेमाची चर्चा आहे. पण या ‘रील’ धुरंधरला एका ‘रिअल’ खेळाडूने चक्क ओपन चॅलेंज दिलंय! नेहमी आपल्या वादग्रस्त आणि हटके वक्तव्यांनी चर्चेत राहणारा अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. यावेळी त्याचं टार्गेट दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ सिनेमा आहे.

निमित्त होतं ‘बिग बॉस मराठी’च्या एका खास रियुनियन पार्टीचं. अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) हिने आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींसाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं. तिथे आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये अभिजीत बिचुकले हजर झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना धुरंधर सिनेमाचा विषय निघाला आणि बिचुकलेची गाडी सुसाट सुटली.

Abhijit Bichukale on Dhurandhar Movie

पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, “तुम्हीच म्हणालात ना मी धुरंधरसारखा दिसतो? सिनेमातला धुरंधर लोक ५०-१०० दिवसांत विसरून जातील. पण महाराष्ट्राचा खरा धुरंधर हा अभिजीत बिचुकले आहे.” आपलं हे बिरूद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असाच काहीसा त्याचा तोरा होता. बिचुकलेंच्या या वक्तव्यावर आता सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला असून नेटकरी त्याची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.

बिचुकलेंनी ‘बिग बॉस मराठी २’ आणि त्यानंतर हिंदी बिग बॉसही चांगलंच गाजवलं होतं. हे वक्तव्य अशा वेळी आलंय जेव्हा लवकरच Bigg Boss Marathi 6 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शोच्या घराची पहिली झलकही समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात बिचुकलेंसारखा कोणी ‘एंटरटेनर’ दिसणार का? आणि बिचुकले पुन्हा काही नवीन राडा करणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)