अकोला, 18 नोव्हेंबर: अकोल्यात सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. पतीला एसटी महामंडळात नोकरी लावण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावेत, यासाठी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
करुणा मयूर वानखडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे राहणाऱ्या मनोहर मोहोड यांची ती मुलगी होती. १२ मे २०२४ रोजी तिचा विवाह अकोल्यातील खडकी परिसरातील मयूर ऊर्फ सुमित वानखडे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर अल्पावधीतच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली.
पतीला एसटी महामंडळात नोकरी मिळावी यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरच्यांकडून सतत होत होती. या जाचाला कंटाळून अखेर करुणाने गळफास घेतला. या प्रकरणी करुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी पती मयूरसह सासू, नणंद, दीर आणि भावजई अशा एकूण आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या
- कार्तिकी वारीच्या तोंडावर पंढरपुरात गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
- ॲडलेड स्ट्रायकर्सला मोठा धक्का; सोफी एक्लेस्टोन दुखापतीमुळे WBBL 2026 मधून बाहेर








