मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग; झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी फुकारी घालून मुलाकडून हत्या

मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने जन्मदात्याची डोक्यात लोखंडी फुकारी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमधील येवती येथे घडली आहे.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

धाराशिव, 14 नोव्हेंबर: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने २९ वर्षीय मुलाने त्यांच्या डोक्यात लोखंडी फुकारीने वार करून हत्या केली. येवती गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

येवती येथील डोंबाळे वस्तीत राहणारा आरोपी श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९) याने १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वडील खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६) यांच्याकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. यावर वडिलांनी, ‘आता रात्र झाली आहे. कोणालाही फोन करू नकोस, मी मोबाइल देणार नाही,’ असे सांगत नकार दिला. त्यानंतर ते घरासमोरील अंगणात झोपण्यासाठी गेले.

वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपी बबलू घराबाहेर निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा घरी परतला. रागाच्या भरात त्याने चुलीजवळ ठेवलेली लोखंडी फुकारी हातात घेतली आणि अंगणात झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सुरेखा खंडू डोंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे करत आहेत. दिवाळीच्या सणासुदीत मोबाईलसारख्या कारणावरून जन्मदात्याची हत्या झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही