डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास ईएमआय वाढण्याची तज्ज्ञांची शक्यता

आरबीआयच्या आगामी पतधोरण बैठकीत रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गृहकर्जासह वैयक्तिक कर्जाचे व्याजदर वाढून ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते.

Published On: 

RBI repo rate hike expected to impact home loan EMI

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक २ ते ४ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. या बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने गृहकर्ज आणखी महाग होऊ शकते. परिणामी, नव्याने घर खरेदी करू पाहणाऱ्यांना जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल, तर फ्लोटिंग रेटवर आधारित सध्याच्या कर्जदारांचा ईएमआय (EMI) वाढण्याची चिन्हे आहेत.

तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर आरबीआयने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो रेट २५ बेसिस पॉईंटने वाढवला होता. यामुळे हा दर ५.५० टक्क्यांवर पोहोचला. आता आगामी बैठकीतही रेपो दरात ०.२५ ते ०.५० टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सार्वजनिक बँका, खासगी बँका आणि होम फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्जासह वैयक्तिक कर्जाचे व्याजदरही वाढवले जातील.

डीबीएस (DBS) बँकेच्या कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील महागाई केवळ खाद्यपदार्थांच्या वाढत्या दरांपुरती मर्यादित नव्हती; तर या महागाईचा परिणाम इतर वस्तूंवरही दिसून येत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये आरबीआय रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

रेपो रेट वाढीचा निर्णय प्रामुख्याने ऑक्टोबरपर्यंतच्या रिटेल इन्फ्लेशन (किरकोळ महागाई) डेटाच्या आधारावर घेतला जाईल, कारण नोव्हेंबर महिन्यातील महागाईचा अहवाल पतधोरण बैठकीनंतरच समोर येणार आहे. दरम्यान, बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवल्यास, त्यांना ग्राहकांच्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरातही वाढ करावी लागेल. सर्वसाधारणपणे बँका आधी कर्जाचे व्याजदर वाढवतात आणि त्यानंतर मुदत ठेवींचे दर वाढवले जातात.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही