गांधी कुटुंबातील मृत्यू आणि परदेशी महिलेचा प्रवेश हा विलक्षण योगायोग; सोनिया गांधींवर कंगना रणौतची टीका

भाजप खासदार कंगना रणौतने सोनिया गांधींवर गंभीर आरोप करत गांधी कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूंना आणि परदेशी महिलेच्या प्रवेशाला योगायोगांची मालिका म्हटले आहे.

Published On: 

Kangana Ranaut making a statement about Sonia Gandhi and the Gandhi family

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यावर गंभीर शब्दांत निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगनाने सोनिया गांधींच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, गांधी कुटुंबात घडलेल्या विविध घटनांना तिने ‘योगायोगांची मालिका’ म्हटले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयी लिहिताना कंगनाने म्हटले आहे की, ‘सध्या सर्वजण एनव्हिडिया हनी ट्रॅप वादावर चर्चा करत आहेत. आणीबाणीच्या काळातील गांधी कुटुंब आणि भारतीय राजकारणाचा मी सखोल अभ्यास केला आहे. एक रहस्यमय परदेशी नागरिक गांधी कुटुंबात कशी येते आणि त्यानंतर सत्तेचे संभाव्य वारसदार असलेल्या इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी या सर्वांचा मृत्यू कसा होतो, हे मला कधीच समजले नाही. सरतेशेवटी, सत्तेसाठी केवळ ती परदेशी नागरिक सोनिया गांधी या एकमेव उमेदवार उरतात.’

या पोस्टमध्ये पुढे कंगनाने असेही लिहिले आहे की, ‘अनेक योगायोग असे कसे जुळून आले, याचे लोकांना आश्चर्य वाटले नाही. इतकेच नव्हे, तर त्या परदेशी महिलेने दहशतवाद्यांसाठी खोटे अश्रू ढाळले आणि उघडपणे परदेशी अजेंडा राबवला. असे असतानाही, त्यांनी २०१४ पर्यंत अनेक दशके देशावर राज्य केले.’ याव्यतिरिक्त, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बोलताना कंगनाने स्पष्ट केले होते की, ती इंदिरा गांधींकडे केवळ राहुल गांधींच्या आजी म्हणून पाहत नाही, तर त्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांचा इतिहास संपूर्ण भारतीयांशी जोडलेला आहे.

दरम्यान, २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २८२ जागा जिंकत एनडीएचे सरकार स्थापन केले आणि मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे, काँग्रेसला केवळ ४४ जागांवर समाधान मानावे लागले, ज्यामुळे काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारची सत्ता संपुष्टात आली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही