डोंबिवली, 17 ऑक्टोबर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही राजकीय वाटचालीत मोठे पद मिळावे, यासाठी डोंबिवलीमधील नवरात्रोत्सवात देवीला साकडे घालण्यात आले आहे. या गाऱ्हाण्यावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी 'गाऱ्हाणं घातलं की ते खरं होतं', अशी प्रतिक्रिया दिल्याने आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवासाठी एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी देवीच्या चरणी घालण्यात आलेल्या गाऱ्हाण्यात केवळ शिंदे पिता-पुत्रांच्या राजकीय भविष्याबाबतच इच्छा व्यक्त करण्यात आली नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
या गाऱ्हाण्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणातील सण-उत्सवांच्या परंपरेला उजाळा दिला. या ठिकाणी आल्यावर अगदी कोकणात आल्यासारखे वाटत असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असते; कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि सण-उत्सव ही आपली परंपरा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याचे नमूद करत त्यांनी वारकरी बांधवांच्या भजनाचाही उल्लेख केला. बळीराजा या दुष्काळाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल, अशी आशा व्यक्त करत या संकटा निवारणासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकीय भवितव्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, नवरात्रोत्सवातील हे गाऱ्हाणे आणि त्यावर एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अर्थखात्याची एवढीच चिंता असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात जावं; भाजपचा हल्लाबोल
- उद्धव ठाकरेंचा राजनाथ सिंहांना पलटवार; ‘दिल्लीत पोलीस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे’
- शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब वर्षावर गेले होते; मैत्री आणि मतभेदांच्या उद्धव ठाकरेंनी सांगितल्या आठवणी
Quick Answers
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही राजकीय वाटचालीत मोठे पद मिळावे, यासाठी देवीला साकडे घालण्यात आले.
या गाऱ्हाण्यावर एकनाथ शिंदे यांनी 'गाऱ्हाणं घातलं की ते खरं होतं' अशी प्रतिक्रिया दिली.
हा नवरात्रोत्सव डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थनाही या गाऱ्हाण्यात करण्यात आली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






