कोल्हापूर, 17 ऑक्टोबर: गोकुळ दूध संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, महायुतीच्या नेत्यांकडून संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला मतदारांना (ठराव धारकांना) सहलीवर पाठवल्यानंतर, आता थेट कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या मंदिरात त्यांच्याकडून शपथा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आचारसंहिता लागू असतानाही हा प्रकार घडत असून, मतदारांना देवीच्या प्रकोपाची भीती दाखवल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ हे मतदारांना संबोधित करताना दिसत आहेत. नवरात्रोत्सव आणि शुक्रवारचे औचित्य साधून मुश्रीफ यांनी मतदारांना म्हटले आहे की, "मी हसन मुश्रीफ शपथ घेतो की, २५ पैकी २५ उमेदवारांना दिलेल्या चिन्हावर शिक्का मारेन आणि गद्दारी करणार नाही, अशीच शपथ तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे." यासाठी दोन-अडीच तास लागतील आणि त्यानंतर देवदर्शनाची व्यवस्था केली असल्याचेही ते सांगत आहेत. तसेच, "कागल तालुक्याची अब्रू वाचवणे आता तुमच्या हातात आहे. यल्लमा देवी किती जागृत आहे, हे तुम्हाला माहीत आहे. खोटं वागल्यास देवी अंगावर उठते," अशी भीतीही त्यांनी मतदारांना घातली आहे.
याच व्हिडीओमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हेदेखील मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. गोकुळ हा केवळ राज्यापुरता मर्यादित नसून देशभरात नावाजलेला दूध संघ असल्याने ही सामान्य निवडणूक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "आमची, गोकुळ साहेबांची आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची कॉलर राज्य पातळीवर खाली होता कामा नये. आम्ही आणि आमचे उमेदवार सर्वात आधी शपथ घेणार आहोत," असे महाडिक म्हणाले. परवा होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना 'कपबशी' चिन्हावर मतदान करण्याची शपथ यल्लमा देवीला स्मरून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार ९ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून चिन्ह वाटपही पार पडले आहे. आता १८ ऑक्टोबर रोजी या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘एक ज्ञानेश कुमार जाईल अन् दुसरा येईल’, निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनावर AIMIM नेत्याचे मोठे वक्तव्य
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राम पूर्णेकरांची देवेंद्र फडणवीसांशी ठाण्यात भेट, मुख्यमंत्र्यांचा न्यायाचा शब्द
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन; CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना मध्यरात्री अटक
Quick Answers
कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या मंदिरात गोकुळ दूध संघाच्या मतदारांकडून (ठराव धारकांकडून) शपथ घेतली जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना, 'मी २५ पैकी २५ उमेदवारांना दिलेल्या चिन्हावर शिक्का मारेन आणि गद्दारी करणार नाही,' अशी शपथ घेण्यास सांगितले, तसेच खोटं वागल्यास देवी अंगावर उठते अशी भीतीही घातली.
खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीच्या सर्व २५ उमेदवारांना 'कपबशी' या चिन्हावर मतदान करण्याची शपथ यल्लमा देवीला स्मरून घेण्याचे आवाहन केले.
या निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








