‘एक ज्ञानेश कुमार जाईल अन् दुसरा येईल’, निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनावर AIMIM नेत्याचे मोठे वक्तव्य

ज्ञानेश कुमार यांना हटवून काय साध्य होणार? असा सवाल करत एआयएमआयएमचे नेते शौकत अली यांनी सिस्टिम बदलण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

MHD LOGO

मुरादाबाद, 17 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे उत्तर प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी मुरादाबाद येथे मोठे भाष्य केले आहे. केवळ एका व्यक्तीला पदावरून हटवून काहीही साध्य होणार नाही, तर संपूर्ण व्यवस्थाच बदलण्यासाठी लढा दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून राजधानी दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आणि सीजेपीने (CJP) मोठे आंदोलन उभारले आहे. राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुरुवातीला उग्र निदर्शने केली होती, त्यानंतर आता सीजेपीच्या नेत्यांनी ही बाजू उचलून धरली आहे. मात्र, आता या आंदोलनाची धार कमी होत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे.

या मुद्यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याआधीच ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. आता शौकत अली यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. 'एका ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवल्यावर दुसरा ज्ञानेश त्या पदावर येईल', असे सांगत त्यांनी केवळ एका व्यक्तीविरोधात न लढता सिस्टिम बदलण्याचे आवाहन केले आहे.

याचवेळी शौकत अली यांनी इंडिया आघाडीवरही जोरदार निशाणा साधला. इंडिया आघाडी आपल्या पक्षाशी भेदभाव करत असून, आम्हाला जाणीवपूर्वक वाळीत टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आम्हाला बैठकीलाही बोलावले जात नसल्याचे अली यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

केवळ एका व्यक्तीला पदावरून हटवून काही साध्य होणार नाही, एका ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवल्यावर दुसरा ज्ञानेश त्या पदावर येईल; त्यामुळे संपूर्ण व्यवस्थाच बदलण्यासाठी लढा दिला पाहिजे, अशी भूमिका शौकत अली यांनी मांडली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही