नागपूर, 16 ऑक्टोबर: नागपुरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनींना एका विशिष्ट धर्माचे संदेश पाठवून त्या धर्माची उपासना पद्धत पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) एका शिष्टमंडळाने आज थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी त्यांच्या संघटनेशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली होती. संबंधित प्राध्यापकाने काही विद्यार्थिनींना आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा, तसेच विशिष्ट धर्माच्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे आणि नियमांचे पालन करावे यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे धार्मिक भावनांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचे विहिंपने म्हटले आहे.
या तक्रारीनंतर विहिंपच्या शिष्टमंडळाने प्रथम महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. मात्र, या गंभीर प्रकरणात अद्याप पीडित विद्यार्थिनी, तिचे कुटुंबीय किंवा महाविद्यालय प्रशासन यापैकी कुणीही पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.
संबंधित प्राध्यापकावर तातडीने कारवाई करून त्याला महाविद्यालयातून हटवावे, अशी मागणी विहिंपने केली आहे. जर हा प्राध्यापक दोषी नसेल, तर एका पीडित मुलीचे कुटुंबीय महाविद्यालयात चौकशीला गेले असताना तो हात जोडून माफी का मागत होता, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये आणि योग्य पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विहिंपकडून देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे शिक्षक मतदारसंघ: शिवसेनेचा अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा, भाजप-शिंदे गट आमनेसामने
- आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील
- न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ जाहीर, रवींद्र जडेजाला डच्चू
Quick Answers
प्राध्यापकाने विद्यार्थिनींना एका विशिष्ट धर्माचे संदेश पाठवून त्या धर्माची उपासना पद्धत पाळण्यासाठी, धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.
संबंधित प्राध्यापकावर तातडीने कारवाई करून त्याला महाविद्यालयातून हटवावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
नाही, अद्याप पीडित विद्यार्थिनी, तिचे कुटुंबीय किंवा महाविद्यालय प्रशासन यापैकी कुणीही पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.
महाविद्यालय प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता योग्य पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विहिंपने दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






