आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का! निकटवर्तीय आणि राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी सोडली ठाकरे गटाची साथ

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे आनंद दुबे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करताना दुबे यांनी हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावरून पक्षाशी वैचारिक मतभेद असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाची सध्याची विचारधारा आणि सार्वजनिक विधानांशी ताळमेळ राखणे कठीण होत चालल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आनंद दुबे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी १ वाजता ठाणे येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, यावेळी स्वतः एकनाथ शिंदे आणि राहुल कनाल उपस्थित राहणार आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांपासून आनंद दुबे हे ठाकरे गटाची राष्ट्रीय पातळीवर आणि विविध व्यासपीठांवर भक्कमपणे बाजू मांडत होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही ते पक्षाची भूमिका स्पष्ट करत. मुंबईच्या राजकारणातील पक्षाचा प्रमुख हिंदी भाषिक चेहरा म्हणून त्यांची ओळख होती, ज्यामुळे महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांमध्येही ते परिचित होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आनंद दुबे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही