राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य; ‘अमेरिका-पाकिस्तान युद्ध झाल्यास भारत पाकच्या बाजूने राहील’

अमेरिका-पाकिस्तान युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील, असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन राठौड यांनी केले असून यावरून राजकीय वाद पेटला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 16 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि 'ऑपरेशन सिंदूर' करत पाकिस्तानला तीन वेळा धडा शिकवला आहे. मात्र, आता राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन राठौड यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुरुवारी बोलताना त्यांनी, भविष्यात अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील, असे विधान केले.

राठौड यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "आपल्या सगळ्यांना हे समजून घेण्याची गरज आहे की, जर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर आम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहोत. कारण ते आमचे शेजारी आहेत," असे राठौड यात म्हणत आहेत. तसेच 'आपसात काही विषय असेल तर त्यांनी भारतासोबत राहिलं पाहिजे' असेही ते या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला आहे.

या वक्तव्यावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी राठौड यांच्यावर जोरदार टीका केली. पाकिस्तान हा एक दहशतवादी देश असून त्यांच्यापासून भारताचे सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना धोका असल्याचे त्या म्हणाल्या. "जर भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यासोबत पक्ष सहमत नसेल, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल का?" असा थेट सवाल करत शमा मोहम्मद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक संदीप गुप्ता यांनी सोशल मीडियावर टीका करताना यातून भाजपची पाकिस्तानबद्दलची भूमिका समोर येत असल्याचा आरोप केला.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीही मदन राठौड यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत भाजपला घेरले आहे. दिल्ली 'आप' युवा विंगचे प्रदेशाध्यक्ष रमेश मटियाला आणि पक्षाचे नेते विनय महाबल मिश्रा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. तर 'आप'चे उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष राम गुप्ता यांनी भाजप आणि पाकिस्तानच्या विचारधारेत समानता असल्याचा आरोप केला आहे. 'अमेरिका-पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तानच्या बाजूने जाऊ' या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठे वादळ आले असले तरी, अद्याप यावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मदन राठौड यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना म्हटले की, भविष्यात जर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले, तर भारत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील कारण ते आमचे शेजारी आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही