ठाणे, 16 ऑक्टोबर: ठाण्यातील राजकीय नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ठाणे गुन्हे शाखेने मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस कसून चौकशी केली. पहिल्या दिवशी नऊ तास, तर दुसऱ्या दिवशी आठ तास चाललेल्या या प्रदीर्घ चौकशीतून पोलिसांच्या हाती काहीतरी ठोस माहिती लागली असल्याची शक्यता पूर्णेकर यांचे वकील ॲडव्होकेट समीर हटणे यांनी व्यक्त केली आहे. विनाकारण पोलीस इतका वेळ कोणाचीही चौकशी करणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. समीर हटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण सहा ते सात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यापैकी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर हा एक साक्षीदार असून, त्याने २४ सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या दिवशी राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांना एकत्र पाहिले होते. याव्यतिरिक्त इतरही काही साक्षीदारांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र पाहिले असून सध्या या साक्षीदारांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. मारेकरी जर केवळ काम मागण्यासाठी मीनाक्षी शिंदे यांच्याकडे येत होते, तर त्यांच्या भेटी कार्यालयाऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी का होत होत्या, असा सवालही वकिलांनी उपस्थित केला आहे.
हत्येपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात बाळू पूर्णेकर यांनी आपल्या बहिणीला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. 'माझ्या नावाची सुपारी निघाली आहे, पण कोणी घ्यायला तयार नाही', असे ते बहिणीला म्हणाले होते. याबाबत त्यांच्या बहिणीने पोलिसांकडे अधिकृत जबाब नोंदवला आहे. दुसरीकडे, राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची गरज नाही हा त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला असला तरी, सलग दोन दिवस झालेल्या कसून चौकशीमुळे तपासातील सस्पेन्स आणखी वाढला आहे.
या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांना गती देण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरिता एक स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक संबंधित ठिकाणचे फुटेज गोळा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये विशेषतः 'महाराजा हॉटेल'मधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, जिथे राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांची बैठक झाली होती. राजेंद्र शिंदे मारेकऱ्यांना इतक्या वेळा का भेटायचे, याचा सखोल तपास आता गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना आता पश्चाताप; राहुल गांधींचा मोठा दावा
- पोलिस मला कधीही उचलू शकतात; तिरंगा मोर्चापूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
- BRIS-W vs ACT-W: ब्रिस्बेन विरुद्ध एसीटी वुमेन्स टी-२० सामन्यासाठी ड्रीम११ प्रेडिक्शन आणि फँटसी टिप्स
Quick Answers
ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांची १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस चौकशी केली. यात पहिल्या दिवशी नऊ तास आणि दुसऱ्या दिवशी आठ तास अशी प्रदीर्घ चौकशी करण्यात आली.
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी २४ सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या दिवशी राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांना एकत्र पाहिले होते.
गणेशोत्सवाच्या काळात बाळू पूर्णेकर यांनी आपल्या बहिणीला 'माझ्या नावाची सुपारी निघाली आहे, पण कोणी घ्यायला तयार नाही', असे सांगितले होते.
पोलिसांनी 'महाराजा हॉटेल'मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, जिथे राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांची बैठक झाली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








