उल्हासनगर हादरलं! रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाची थेट डोक्यात गोळ्या झाडून हत्या

उल्हासनगर स्टेशन परिसरात गोळीबाराची घटना घडली असून, हरीश गझवानी नावाच्या व्यक्तीची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर फरार आहेत.

Published On: 

MHD LOGO

उल्हासनगर, 15 ऑक्टोबर: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्टेशनजवळील कॅम्प क्रमांक चार भागात झालेल्या या अंधाधुंद गोळीबारात हरीश गझवानी या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश गझवानी हे कॅम्प क्रमांक चार परिसरात असताना तिथे अचानक हल्लेखोर आले. त्यांनी पिस्तूल काढून गझवानी यांच्या थेट डोक्यात एकापाठोपाठ दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या या आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गझवानी जागेवरच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जमलेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, वर्दळीच्या रेल्वे स्टेशन परिसरात बंदूकधारी व्यक्ती उघडपणे फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील कॅम्प क्रमांक चार भागात झालेल्या गोळीबारात हरीश गझवानी या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही