प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या नवव्या आणि शेवटच्या सीझनचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला. या शोमध्ये सुपरस्टार सलमान खानने हजेरी लावत अनेक मोठे खुलासे केले. त्यापैकी एक महत्त्वाचा खुलासा १९९८ मध्ये आलेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत होता. दिग्दर्शक म्हणून हा करणचा पहिलाच चित्रपट होता.
या चित्रपटात शाहरुख खानची प्रमुख भूमिका होती. मात्र, काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच 'अमन'ची भूमिका साकारण्यासाठी कुणीही तयार नव्हतं. जवळपास ५-६ अभिनेत्यांनी करणला या कॅमिओसाठी तोंडावर नकार दिला होता. अखेर सलमान खानने स्वतःहून पुढे येत करणची मदत केली आणि मी तुझ्या चित्रपटात कॅमिओ करेन, असे स्वतःच सांगितले.
बॉलिवूडमध्ये या कास्टिंगचा एक किस्सा अत्यंत लोकप्रिय आहे. चंकी पांडेच्या घरी सुरू असलेल्या एका पार्टीत सलमानने करणला आपल्या घरी येऊन चित्रपटाची कथा ऐकवण्यास सांगितलं होतं. आपण काहीच न सांगता, कोणताही अभिनेता कॅमिओसाठी तयार नसल्याचे सलमानला कसं समजलं, असा प्रश्न करणला तेव्हा पडला होता. यावर सलमानने आता पहिल्या एपिसोडमध्ये उलगडा केला की, त्याची बहीण अलविरा खान हिनेच त्याला करणच्या चित्रपटातील भूमिकेबाबत माहिती दिली होती.
चंकी पांडेच्या घरी भेट झाली, तेव्हाच सलमानने चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली होती. खान कुटुंब आणि करणचे वडील यश जोहर यांच्यामध्ये अतिशय चांगले संबंध होते. याच संबंधांमुळे आणि करणच्या वडिलांमुळेच आपण या चित्रपटात कॅमिओ करण्यास तयार झाल्याचे सलमानने नमूद केले.
या शोमध्ये बोलताना सलमानने करणला सांगितले की, चित्रपटासाठी कोणी कोणी नकार दिला हे त्याला माहीत आहे. त्याने थेट दोन अभिनेत्यांची नावे घेत म्हटले, "मला वाटतं सैफ अली खानने तुला रिजेक्ट केलं. चंद्रचूड सिंहनेही नकार दिला, ३-४ आणखीही अभिनेते होते." हे ऐकून करणनेही त्याला दुजोरा दिला आणि म्हणाला की, हो, हे खरं आहे, अनेकांनी कॅमिओ करण्यास नकार दिला होता. शोचा पहिला भाग प्रदर्शित झाल्याने आता भाईजानने आणखी काय काय किस्से सांगितले आहेत, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपके आणि ‘सीजेपी’ला अमेरिकेतून निधी मिळतोय; प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांचा धक्कादायक दावा
- पुणे म्हाडा लॉटरी: तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत संधी
- “आमचं अफेअर होतं, तिनं मला सोडलं अन्…” करिश्मा कपूरबद्दल सलमान खानचं गंमतीशीर वक्तव्य
Quick Answers
चित्रपटात काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच 'अमन'ची कॅमिओ भूमिका साकारण्यासाठी अनेक अभिनेते तयार नव्हते. जवळपास ५-६ अभिनेत्यांनी करण जोहरला या भूमिकेसाठी नकार दिला होता.
सलमान खानची बहीण अलविरा खान हिने त्याला करण जोहरच्या चित्रपटातील या भूमिकेबाबत माहिती दिली होती.
खान कुटुंब आणि करण जोहरचे वडील यश जोहर यांच्यामध्ये अतिशय चांगले संबंध होते. याच संबंधांमुळे आणि करणच्या वडिलांमुळेच सलमानने या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली होती.
सलमान खानच्या सांगण्यानुसार सैफ अली खान आणि चंद्रचूड सिंह यांच्यासह आणखी ३-४ अभिनेत्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता, ज्याला करण जोहरनेही दुजोरा दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








