प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: भारत आणि भारतीय संस्कृतीवर सातत्याने प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबेन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. त्यांनी अभिजीत दिपके आणि 'सीजेपी'ला (CJP) अमेरिकेतून निधी दिला जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये मिलबेन यांनी भारतातील तरुण देशभक्तांना गप्प न बसण्याचे आवाहन केले. त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींच्या विरोधात असणारे आणि भारताचे भविष्य रोखू पाहणारे अमेरिकन देणगीदार अभिजीत दिपके तसेच 'कॉकक्रोच पार्टी'ला अमेरिकेतून निधी पुरवत आहेत. मात्र, २५ वर्षे देशसेवा केलेले, १२ वर्षे पंतप्रधान राहिलेले आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले पंतप्रधान मोदी या विध्वंसक शक्तींसमोर अजिबात झुकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अशा देणगीदारांच्या जागतिक कार्यपद्धतीवरही मिलबेन यांनी सविस्तर भाष्य केले. "एखाद्या पुराणमतवादी जागतिक नेत्याला लक्ष्य करण्यासाठी ते त्या देशातील अमेरिकेत शिकलेल्या व्यक्तीला शोधतात, त्याला कट्टर बनवून मायदेशी परत पाठवतात. त्यानंतर गोंधळ आणि विध्वंस घडवून आणण्यासाठी त्याला निधी दिला जातो," असे मिलबेन यांनी स्पष्ट केले. या प्रयत्नांत कुणालाही यश आले नसले तरी, त्याचा देशाच्या विकासावर आणि प्रशासनावर निश्चितच परिणाम होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
'सीजेपी'च्या विध्वंसक प्रवृत्तीला शांततेने विरोध करण्यासाठी भारतातच जन्मलेल्या, वाढलेल्या आणि शिकलेल्या एका नव्या आवाजाची आता गरज आहे, असे मत मेरी यांनी मांडले. लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तरुणांनी एकत्र येत एक प्रति-चळवळ उभारली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सीजेपीच्या या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपला पाठिंबा दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे म्हाडा लॉटरी: तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत संधी
- “आमचं अफेअर होतं, तिनं मला सोडलं अन्…” करिश्मा कपूरबद्दल सलमान खानचं गंमतीशीर वक्तव्य
- राज्यात उकाड्यासह पावसाचीही शक्यता; IMD कडून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज जारी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







