प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: सलमान खान आणि करिश्मा कपूर यांची ऑनस्क्रिन जोडी नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. आता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ९' या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये या दोघांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सलमानने करिश्माबद्दल केलेल्या एका मिश्किल वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमात करिश्माने सांगितले की, तिने आणि सलमानने आतापर्यंत एकूण ११ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी ते सतत एकत्र असायचे, दोन चित्रपटांचे शूटिंग आणि शो एकत्र केल्याने त्यांच्या बॅगा नेहमी प्रवासासाठी तयारच असायच्या. यावेळी करण जोहरने करिश्माच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. चित्रपटसृष्टीत दोन कलाकार एकत्र काम करतात तेव्हा लोकांचा त्यांच्या नात्याबद्दल गैरसमज होतो, मात्र आमच्यात कोणतेही प्रेम नसून केवळ घट्ट मैत्री असल्याचे करिश्माने करणला पूर्वी सांगितले होते.
करणच्या या बोलण्यावर सलमानने लगेच गंमतीने प्रतिक्रिया दिली. करिश्मा खोटे बोलत असून आमचे अफेअर होते, असा दावा त्याने हसत हसत केला. त्यावर, तो नेहमी असेच काहीही बरळत असतो आणि सर्वांना फक्त 'कंटेंट' देतो, असे उत्तर करिश्माने दिले. पण सलमान इथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, "आमचं अफेअर होतं. मग तिनं मला सोडलं आणि लग्न केलं. माझं हृदय तुटलं होतं." यावर करिश्माने त्याला गप्प बसण्यास सांगत, तो नेहमी तिच्यासोबत असेच करत असल्याचे म्हटले.
यावेळी करिश्माने सलमानसोबतच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली, याचाही किस्सा सांगितला. जेव्हा 'मैने प्यार किया' चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा १६ वर्षांची असलेली करिश्मा सलमानच्या प्रेमात होती. ती सरोज खान यांच्याकडे डान्सचे धडे घेत होती आणि तिथेच सलमानच्या 'बाघी' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. एके दिवशी सलमानने तिला थांबवून विचारले की, "तू डब्बू अंकलची मुलगी आहेस का? मी तुला बघत आलोय, तू खूप मेहनत करते आहेस." त्यानंतर त्याने करिश्माला एक चॉकलेट दिले आणि तेव्हापासून त्यांची घट्ट मैत्री झाली. सलमानला चॉकलेट इतके आवडते की तो नाश्त्यालाही तेच खायचा, असेही तिने नमूद केले.
या शोमध्ये करिश्माने 'दुल्हन हम ले जाएंगे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर प्रसंगही शेअर केला. एका गाण्यासाठी करिश्माने घातलेला छोटा ड्रेस सलमानला अजिबात आवडला नव्हता. सलमान तो ड्रेस घालू देत नसल्याची तक्रार तिने थेट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याकडे केली होती. यावर स्पष्टीकरण देताना सलमान म्हणाला की, तो ड्रेस खूपच छोटा होता आणि तो सतत वर सरकत असल्याने करिश्माला तो नीट करायला सांगावे लागत होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात उकाड्यासह पावसाचीही शक्यता; IMD कडून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज जारी
- भिवंडीत पक्षादेश झुगारणारे समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक बडतर्फ; भाजपला केली होती मदत
- ‘धुरंधर’ आणि ‘टॉक्सिक’चे रेकॉर्ड मोडणार? रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ पहिल्याच दिवशी कमवणार १४० कोटी
Quick Answers
सलमान खान आणि करिश्मा कपूर यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ९' या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये एकत्र हजेरी लावली.
करिश्माने दिलेल्या माहितीनुसार, तिने आणि सलमान खानने आतापर्यंत एकूण ११ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
करिश्मा खोटे बोलत असून आमचे अफेअर होते, नंतर तिने मला सोडून लग्न केले आणि माझे हृदय तुटले होते, असा मिश्किल दावा सलमानने केला.
करिश्मा सरोज खान यांच्याकडे डान्सचे धडे घेत असताना आणि तिथे सलमानच्या 'बाघी'चे शूटिंग सुरू असताना सलमानने तिची विचारपूस करून तिला एक चॉकलेट दिले होते; तेव्हापासून त्यांची घट्ट मैत्री झाली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








