भिवंडी, 15 ऑक्टोबर: भिवंडी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान पक्षादेश झुगारून भाजपला मदत करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी या कारवाईची अधिकृत घोषणा केली.
पालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते आरिफ याकूब शेख यांच्यासह या सहा नगरसेवकांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावत पक्षाबाहेरील उमेदवाराला मदत केली. त्यांनी महासभेत भाजपचे आमदार महेश चौघुले यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस करून त्यांची निवड निश्चित केली, ज्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली.
कारवाई करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये गटनेते आरिफ शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमान उबैद यांचा समावेश आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून आमदार, खासदार आणि नगरसेवक भाजपमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले असून, भिवंडीतही याच पक्षनिष्ठा कमी होण्याच्या प्रवृत्तीचा प्रत्यय आला आहे.
या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी म्हणाले, "पक्षाच्या बळावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षासोबत गद्दारी केली आहे. असे प्रकार पक्ष कधीही खपवून घेणार नाही. या स्वीकृत नगरसेवक निवडीविरोधात आम्ही कायदेशीर लढाई देऊ."
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘धुरंधर’ आणि ‘टॉक्सिक’चे रेकॉर्ड मोडणार? रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ पहिल्याच दिवशी कमवणार १४० कोटी
- हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजचा धुमाकूळ! शाई होपच्या वादळी शतकामुळे भारतासमोर २४८ धावांचे आव्हान
- ६ वर्ष लिव्ह-इन, अन् ३ महिन्यात घटस्फोट! अभिनेते आनंद काळेंनी सांगितला मित्राच्या मुलीचा किस्सा
Quick Answers
स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान पक्षादेश झुगारून भाजपला मदत करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी (बडतर्फी) करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी या कारवाईची अधिकृत घोषणा केली.
कारवाई झालेल्या नगरसेवकांमध्ये गटनेते आरिफ शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमान उबैद यांचा समावेश आहे.
त्यांनी भाजपचे आमदार महेश चौघुले यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस करून त्यांची निवड निश्चित केली होती.
समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांच्या माहितीनुसार, या स्वीकृत नगरसेवक निवडीविरोधात ते कायदेशीर लढाई देणार आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






