६ वर्ष लिव्ह-इन, अन् ३ महिन्यात घटस्फोट! अभिनेते आनंद काळेंनी सांगितला मित्राच्या मुलीचा किस्सा

अभिनेते आनंद काळे यांनी एका व्हिडिओद्वारे वाढत्या घटस्फोटांवर खंत व्यक्त करत, ६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून ३ महिन्यात घटस्फोट घेणाऱ्या जोडप्याचा किस्सा सांगितला.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: आजकालच्या वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणावर आणि नातेसंबंधांवर मराठी अभिनेते आनंद काळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी एका जोडप्याचा धक्कादायक किस्सा सांगत आजच्या पिढीच्या रिलेशनशिप्सबाबत खंत व्यक्त केली.

या व्हिडिओमध्ये बोलताना काळे यांनी त्यांच्या पटवर्धन नावाच्या मित्राच्या मुलीचे उदाहरण दिले. ही मुलगी तब्बल ६ वर्षे तिच्या मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. ही बाब समजल्यानंतर मित्राला साहजिकच धक्का बसला, मात्र तरीही त्याने या दोघांच्या लग्नाला परवानगी देत त्यांचे लग्न लावून दिले.

लग्नानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना आनंद काळे म्हणाले की, "अवघ्या ३ ते साडेतीन महिन्यांतच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मी सहसा असे बोलत नाही, पण यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे. ६ वर्षे तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहता आणि लग्नानंतर लगेचच घटस्फोटासाठी अर्ज करता, यावर काय बोलावे हेच मला समजत नाहीये."

आनंद यांच्या या इन्स्टाग्राम व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने आजच्या पिढीला जबाबदारी नको असल्याचे म्हणत, लिव्ह-इनची तुलना विवाहसंस्थेशी होऊ शकत नसल्याची कमेंट केली. यावर सहमती दर्शवत आनंद काळे म्हणाले, "मला आतापर्यंत वाटायचं की दिवसातले २-४ तास भेटून होणारं अफेअर आणि लग्नानंतरचे २४ तास एकत्र राहणं यात फरक आहे. पण, लिव्ह-इनमध्ये ६ वर्षे राहिल्यानंतरही असं कसं होऊ शकतं?"

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही