राजगडावर गिर्यारोहकाचा मृत्यू; मालकाच्या मृतदेहासोबत गडावरून उतरत पाळीव कुत्र्याने निभावली स्वामीनिष्ठा

राजगडावर हृदयविकाराने मृत्यू झालेल्या जिज्ञेश खांडाळकर या तरुणाच्या पाळीव कुत्र्याने मृतदेहासोबत खाली उतरत मालकाची शेवटपर्यंत साथ न सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: किल्ले राजगडावर एका ३० वर्षीय हौशी गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१० ऑक्टोबर) घडली. या दुःखद प्रसंगात मृत तरुणाच्या पाळीव कुत्र्याने दाखवलेली स्वामीनिष्ठा पाहून उपस्थित गिर्यारोहक आणि पर्यटकांचे डोळे पाणावले.

जिज्ञेश सदाशिव खांडाळकर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते राजगड पाहण्यासाठी आले होते. गड चढल्यानंतर त्यांना अचानक थकवा जाणवू लागला. दरदरून घाम आल्यामुळे ते विश्रांतीसाठी एका दगडावर बसले. मात्र, काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रवासात जिज्ञेश यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. आपल्या मालकाला काहीतरी त्रास होत असल्याचे या मुक्या प्राण्याला जाणवले. मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही या कुत्र्याने शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नाही.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिज्ञेश यांचा मृतदेह गडावरून खाली आणण्यात येत होता. त्यावेळी हा पाळीव कुत्राही मृतदेहाच्या सोबत सतत चालत राहिला. मालकाला सोडून जाण्याची कल्पनाही न शिवलेल्या या मुक्या जीवाची इमानदारी पाहून गडावरील सर्वांचेच मन हेलावून गेले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

किल्ले राजगडावर मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव जिज्ञेश सदाशिव खांडाळकर (वय ३०) असे आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही