Share

अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आर्थिक फसवणूक प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात नाशिकमधील भोंदू अशोक खरातला मोठा धक्का बसला असून, सत्र न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Published On: 

Ashok Kharat sent to judicial custody by Nashik court

नाशिक, 11 ऑक्टोबर: आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात नाशिकमधील भोंदू अशोक खरातला (Ashok Kharat) मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने खरातची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे.

वृद्धाश्रम उभारण्याचे कारण सांगून खरातने एका संबंधित व्यक्तीकडून भूखंड खरेदी केला होता. मात्र, प्रत्यक्षात या जागेचा वृद्धाश्रमासाठी कोणताही वापर झाला नसल्याचा आरोप आहे. याच प्रकरणातून फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

या गुन्ह्यात खरातला अटक केल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात होता. आज कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी पोलीस कोठडी मागण्याचे हक्क राखून ठेवत सध्यातरी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खरातच्या अडचणी केवळ आर्थिक फसवणुकीपुरत्या मर्यादित नाहीत. त्याच्यावर लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गंभीर आरोपही प्रलंबित असून, या प्रकरणांची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे न्यायालयात पुढे काय घडणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मार्च महिन्यात अटक झाल्यापासून खरातचे अनेक कारनामे उजेडात आले आहेत. त्याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. यापैकी १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) असून, मुंबईतील विशेष न्यायालयात ईडीचा स्वतंत्र खटलाही त्याच्याविरुद्ध सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही