Share

“मी त्यांचं तोंडही पाहत नाही”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एकत्र प्रवास केल्यानंतर ओमराजेंचा पाटलांवर हल्लाबोल

धाराशिव दुष्काळ पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून एकत्र प्रवास केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

Omraje Nimbalkar during Dharashiv drought inspection tour

धाराशिव: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीतून प्रवास केल्यानंतर, शिवसेना (शिंदे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे राजकीय विरोधक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांना लोकांच्या समस्या सांगण्यासाठी मी गाडीत बसलो होतो. त्यांचं (राणा जगजितसिंह पाटील) मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच नीXXX आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी दिली.

राज्यात सध्या भयंकर दुष्काळी परिस्थिती असून याची तुलना कोणत्याही जुन्या दुष्काळाशी होऊ शकत नाही, असे निंबाळकर म्हणाले. ओल्या दुष्काळात काहीतरी पदरात पडते, मात्र कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे करपली असून त्यांचा सर्व खर्च मातीत गेला आहे. पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्याही हे लक्षात आले असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे निंबाळकर म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. केंद्र सरकारची मदत मिळवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, महापुरातील नुकसानभरपाईपैकी खरडून गेलेल्या जमिनीची मदत अद्याप बाकी असून ती लवकरच मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विरोधकांनी ‘फार्स’ म्हटल्याच्या आरोपालाही ओमराजेंनी प्रत्युत्तर दिले. “सरकारचे प्रमुख बांधावर येऊन शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेत असतील, तर त्याला दौऱ्याचा फार्स म्हणणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. दौऱ्यादरम्यान लावण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, ही व्यवस्था केवळ मलकापूर येथे होती आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ती काढून टाकण्यात आली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही