पैठणमध्ये चालत्या बसमध्ये २ लाखांच्या मंगळसूत्राची चोरी; ५ दिवसांनी महिला चोरटीचा चेहरा आला समोर!

पैठणमध्ये चालत्या बसमध्ये सहप्रवासी बनून आलेल्या महिलेने २ लाख २० हजारांचे मंगळसूत्र हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published On: 

Paithan crime news mangalsutra theft police station MIDC

पैठण | किरण काळे पाटील: चालत्या एसटी बसमध्ये शेजारी बसलेल्या एका अनोळखी महिलेने हातचलाखीने एका तरुणीच्या गळ्यातील सव्वा दोन लाखांचे मंगळसूत्र (Mangalsutra Theft) हातोहात लांबवले. पैठणजवळ घडलेल्या या घटनेने बसप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

छत्रपती संभाजीनगरहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील वैष्णवी मतकर या तरुणीच्या १५ ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर एका महिला चोरटीने डल्ला मारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चोरी केल्यानंतर ही महिला फिल्मी स्टाईलने भररस्त्यात एका चालत्या गाडीत बसून पसार झाली. याप्रकरणी आता एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात (Paithan Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mangalsutra Theft | चालत्या बसमध्ये फिल्मी स्टाईल चोरी

वैष्णवी मतकर (वय २१) या त्यांच्या वडिलांसोबत २१ ऑगस्ट रोजी सकाळी रक्षाबंधनासाठी शेंदुर्णीला (जि. जळगाव) जात होत्या. सव्वा अकराच्या सुमारास त्यांची बस पैठणमध्ये थांबली. तिथे एक महिला बसमध्ये चढली. तिने थोडी जागा देण्याची विनंती करत वैष्णवी यांच्या शेजारी जागा मिळवली. बस काही वेळातच कातपूर फाट्यावर पोहोचली. तिथे ही महिला उतरण्यासाठी उठली, तेव्हा वैष्णवी यांना गळ्यातील तब्बल २ लाख २० हजार रुपये किमतीचे जुने मंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात आले.

मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्र नसल्याचे पाहून वडिलांनी लगेच त्या महिलेला हटकले. “तू माझ्या मुलीचे मंगळसूत्र घेतले का?” अशी विचारणा होताच ती काहीही न बोलता खाली उतरली आणि पळ काढू लागली. वैष्णवी यांनी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती हिसका देऊन भरधाव गाडीत बसून पळून गेली.

माहेरी जाण्याची घाई असल्याने वैष्णवी थेट जळगावला गेल्या. मात्र, पाच दिवसांनंतर २६ तारखेला त्यांच्या मामांच्या मोबाईलवर काही फोटो आले. ते फोटो पाहताच वैष्णवी यांनी या महिला चोरटीला तात्काळ ओळखले.

या महिलेचे नाव कोमल भाऊसाहेब ननवरे (रा. दावरवाडी, ता. पैठण) असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिनेच हे मंगळसूत्र लांबवल्याची खात्री झाल्यानंतर वैष्णवी यांनी २८ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पैठण पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही