Share

रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, ४०-४० लाखांना विकला गेला FDA पेपर

एमपीएससीने औषध निरीक्षक भरती रद्द केल्यानंतर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. एजंटांमार्फत तब्बल ४० लाखांना पेपर विकला गेल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

Published On: 

MPSC FDA Paper Leak Rohit Pawar demands resignation of chairman

MPSC FDA Paper Leak: एमपीएससीने नुकतीच अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील ‘औषध निरीक्षक’ पदाची भरती रद्द केली. पेपरफुटीमुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. पण हा पेपर फक्त एकाच विद्यार्थ्याकडे फुटला, हे आयोगाचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांनी थेट फेटाळून लावलंय.

रोहित पवारांनी एक्सवर (X) पोस्ट करत आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय. राज्यभरात पसरलेल्या एजंटांच्या रॅकेटमार्फत तब्बल ४०-४० लाखांना हा पेपर विकला गेलाय. हीच खरी वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही या काळ्या बाजाराची पूर्ण कल्पना असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

प्रकरण दाबू नका! असा स्पष्ट इशाराच पवारांनी दिलाय. पोलिसांचा चौकशी अहवाल तातडीने सार्वजनिक करा. आम्ही ज्या एजंटांची नावे दिली, त्यांचं पुढे काय झालं? यात आयोगातील कुणाचा हात आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? असा सडेतोड सवाल त्यांनी विचारले आहेत. आयोगाने जर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, तर गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, ही मागणी आता जोर धरू लागलीये. सरकारने आता स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष नेमावा. तसेच सामान्य प्रशासन मंत्र्यांनी स्वतःहून पुढे येत सत्य जनतेसमोर मांडावं, असंही पवारांनी ठणकावून सांगितलंय. फेरपरीक्षेचा निर्णय झाला असला, तरी या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचं मोठं आव्हान आता यंत्रणांसमोर आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही