Share

‘एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा’; विजय वडेट्टीवारांची इच्छा

देवेंद्र फडणवीसांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त करत मोठे राजकीय वक्तव्य केले.

Published On: 

Vijay Wadettiwar on Fadnavis PM

नागपूर : भाजपच्या संसदीय मंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची पुन्हा निवड झाली. त्यांनतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या शक्यतेबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

“देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांची नियुक्ती भाजपच्या वरिष्ठ समितीत केली असावी. ते सिनियर नेते आहे, भारतीय जनता पक्षाने कोणाला कुठे घ्यायचे, हा त्यांचा प्रश्न आहे.” असे वडेट्टीवार म्हणाले.

“आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पूर्वी पंतप्रधान व्हावे. कारण २०२९ नंतर त्यांना काही संधी नाही. एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा,” अशी इच्छा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांना भाजप पुढे नेतील की एवढ्यावरच मर्यादित ठेवणार, हे आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar on Fadnavis PM

विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील भूमिकेवर भाष्य करण्यास नकार दिला. “जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार पाहत बसेल. त्याच्यावर मी अजिबात बोलणार नाही. जरांगे आणि सरकार यांचे आता काय आहे, सरकारचे कोणते मंत्री जातील कोण जाणार नाही, ते काय उपोषण करतील याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमची भूमिका एवढीच आहे की, आमची जातनिहाय जनगणना करा आणि आमचे आम्हाला द्या.” असे वडेट्टीवार म्हणाले.

“जर काही बोगस नोंदी असतील तर ते कोर्टात टिकणार नाही. आताही निर्णय झाले, पुढे होणार आहे. न्याय आणि संविधानाच्या चौकटीत बसतील त्यांना त्या जातीत समावेश केले जाईल. कुणाच्या बोलण्यावरून निर्णय घेतला तरी तो टिकणार नाही. त्यामुळे त्यावर फार काही बोलायची गरज वाटत नाही,” असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. “जी मुलगी स्टेजवर आली होती ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेदना घेऊन आली होती. तिने मराठी भाषेत आदिवासी विद्यार्थ्यांवर सरकार कशा पद्धतीने अन्याय करत आहे आणि त्यांना सुविधांपासून वंचित ठेवलं जात आहे, हे मांडलं.” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

पुढे वडेट्टीवार म्हणाले की, “सरकार आदिवासी मुलींवर अविश्वास दाखवत आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री यावर प्राथमिकता देऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील,”

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. “राहुल गांधी तरुणांच्या पाठीशी उभे आहेत. विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्यांच्या सोबत उभे राहणे, जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे, ही राहुल गांधी यांची भूमिका आहे.” असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी नागपुरातील विद्यार्थ्यांसोबत ‘छात्रो की गुंज’ संवाद साधण्यासाठी होकार दिला आहे. कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही