डोळ्यांदेखत २२ फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती कोसळते आणि एका क्षणात आनंदाचं रुपांतर आक्रोशात होतं! विचार करूनच अंगावर काटा येतो ना? मुंबईतल्या ‘भुलेश्वरच्या राजा’च्या आगमन मिरवणुकीत असाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला.
हसत-खेळत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत सुरू होतं. मंडळाच्या मंडपापासून मूर्ती अवघ्या ५०-६० मीटर अंतरावर आली होती. पण अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती थेट भाविकांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. पण हा अपघात नेमका कशामुळे झाला?
Bhuleshwarcha Raja Accident: सत्य समोर!
दुर्घटना घडल्यानंतर साहजिकच सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षदर्शींमध्ये एकच चर्चा सुरू झाली. रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे ट्रॉलीचा तोल गेला आणि मूर्ती कोसळल्याचा दावा काही नागरिकांनी केला. “खड्ड्यात चाक अडकलं, एक मोठा झटका बसला आणि बाप्पाची मूर्ती हलायला लागली,” असं काही जणांचं म्हणणं होतं.
पण, आता अग्निशमन दल आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासातून एक वेगळाच खुलासा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे रस्त्यावर असे कुठलेच मोठे खड्डे आढळले नाहीत. मग नेमकं काय घडलं?
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तीला मागच्या बाजूने आधार देण्यासाठी केलेलं ‘वेल्डिंग’ हाच या दुर्घटनेचा मुख्य सूत्रधार ठरला. हे वेल्डिंग पुरेसं मजबूत नव्हतं. अचानक हेच वेल्डिंग तुटलं आणि मूर्तीचा भार न पेलवल्याने ती थेट पुढील बाजूस कोसळली.
या दुर्दैवी घटनेत अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (३३) आणि ब्रिजेश जोशी (३०) या दोन तरुणांचा करुण अंत झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर, जखमी झालेल्या पाच जणांमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे.
दुसरीकडे, या दुःखाच्या प्रसंगी भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या कुटुंबांना मोठा मदतीचा हात दिला आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, तर जखमींना १ लाख रुपयांची वैयक्तिक मदत केली आहे. बाप्पाच्या आगमनावेळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबईत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अनर्थ; महाकाय गणेशमूर्ती कोसळून दोघांचा करुण अंत
- राहुल गांधींचा पुण्यातून मोदी सरकारवर थेट निशाणा; मुलींच्या शिव्यांवरून सांगितला ‘तो’ किस्सा
- लाडकी बहीण योजनेचा अजब कारभार; अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात गेले तब्बल ९,६०५ कोटी!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







