🕒 1 min read
जालना: भरदिवसा रस्त्यावरून जाणारी बस अचानक अडवली जाते आणि एक तरुण आत घुसून एका तरुणीला जबरदस्तीने खाली ओढण्याचा प्रयत्न करतो… हा एखाद्या चित्रपटातील सीन वाटतोय ना? पण जालन्यात हा संतापजनक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.
जालना शहरातील औद्योगिक परिसरात एका माथेफिरूने खाजगी ट्रॅव्हल्सची बस अडवून मोठा धुडगूस घातला. या प्रकाराला विरोध करत जाब विचारणाऱ्या बस चालकालाही या तरुणाने अमानुषपणे मारहाण केली असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
Jalna Crime News: सीसीटीव्हीत कैद झाला भररस्त्यातील थरार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस औद्योगिक परिसरातून जात असताना अचानक एका तरुणाने ती रोखली. तो थेट आत घुसला आणि एका प्रवासी तरुणीला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागला.
दुसरीकडे, चालकाने प्रसंगावधान राखत या गुंडगिरीला विरोध केला आणि जाब विचारला. पण रागाच्या भरात या तरुणाने चालकाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करायला सुरुवात केली.
हा सर्व प्रकार बसमधील सीसीटीव्हीत आणि खुद्द चालकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चालकाच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- व्हिएतनाममध्ये समुद्रात अचानक बोट उलटली; १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
- सुप्रिया सुळे भडकल्या: ‘आता फक्त मनसेत जाणं बाकी राहिलंय…’ पक्षांतरावरून खोचक टोला
- पार्थ पवार अडकणार विवाहबंधनात: ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण जिच्याशी पुण्यात होणार साखरपुडा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












