Share

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; मुंबईतील सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना रद्द, कारण काय?

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी मुंबईतील ऐतिहासिक ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना अस्वच्छतेमुळे निलंबित केला आहे. राज्यभरात १६ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

Published On: 

Tukaram Mundhe FDA - Tukaram Mundhe meeting with NCP delegation about shooting set food quality.

मुंबईत चर्चगेटला गेल्यावर तुम्ही कधी तिथलं सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’ खाल्लंय का? जर हो, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच अस्वस्थ करेल. आपल्या शिस्तप्रिय आणि कडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी पदभार स्वीकारताच आपल्या धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

त्यांनी थेट मुंबईकरांच्या आवडत्या आईस्क्रीम पार्लरवर कारवाईचा बडगा उगारल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या पथकाने एकाच दिवशी तब्बल १६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर अचानक छापेमारी केली.

Tukaram Mundhe FDA Action

या धडक मोहिमेत नरिमन पॉईंट परिसरातील ऐतिहासिक ‘के. रुस्तम आईस्क्रीम’ दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तिथे आढळलेली भीषण अस्वच्छता पाहून खुद्द अधिकारीही चक्रावले आहेत. ‘रुस्तम अँड कंपनी’ हे मुंबईतील ग्राहकांचे आणि पर्यटकांचे हक्काचे आणि अत्यंत जुने ठिकाण मानले जाते.

पण, तपासणीदरम्यान या दुकानात जिवंत उंदीर आणि माशांचा मुक्त संचार असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. दुसरीकडे, आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ‘कोल्ड चेन’ व्यवस्था देखील खंडित अवस्थेत होती.

एवढंच नाही तर, दुकानात चक्क मुदत संपलेले (Expired) पदार्थही साठवून ठेवले होते. या सर्व गंभीर प्रकारांची आणि नियमांच्या उल्लंघनाची दखल घेत प्रशासनाने ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा’ अंतर्गत थेट परवानाच निलंबित करण्याची कठोर कारवाई केली.

तुकाराम मुंढेंचा हा दणका फक्त एका दुकानापुरता मर्यादित नाही. एकाच दिवसात राज्यभरात राबवलेल्या या मोहिमेत १० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर मुंबई आणि नाशिकमधील २ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.

याव्यतिरिक्त, राज्यभरातून तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला असून एकाला अटकही झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा कडक इशारा आता प्रशासनाने दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही