Share

आमिर खानशी लग्न करताच गौरी स्प्रॅटने खरंच धर्म बदलला? लग्नानंतर चर्चांना उधाण

आमिर खानने ५ जुलैला गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं. पण लग्नानंतर गौरीच्या धर्मपरिवर्तनाच्या चर्चांना उधाण आलं असून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी नाही.

Published On: 

Aamir Khan Marriage - Aamir Khan and Gauri Sprat wedding ceremony picture

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला, पण लग्नापेक्षा जास्त चर्चा एकाच प्रश्नाची रंगलीय ती म्हणजे आमिरची नवी नवरी गौरी स्प्रॅटने (Gauri Sprat) लग्नासाठी खरंच इस्लाम धर्म स्वीकारला आहे का?

५ जुलै २०२६ रोजी वांद्रे इथल्या निवासस्थानी आमिर आणि गौरीने अत्यंत साधेपणाने कायदेशीर विवाह उरकला. गेल्या वर्षी जिची ओळख गर्लफ्रेंड म्हणून करून दिली होती, तीच गौरी आता अधिकृतपणे आमिरची पत्नी झाली आहे.

Aamir Khan Marriage

सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. पण याच फोटोंखाली नेटकरी सातत्याने गौरीच्या धर्मपरिवर्तनाबाबत प्रश्न विचारताना दिसत आहेत.

याबाबत आमिर खान किंवा गौरीकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हा विवाह कायदेशीर नोंदणी पद्धतीने (Registered Marriage) पार पडला आहे.

कायद्यानुसार अशा विवाहात जोडीदाराला धर्म बदलण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे गौरीने धर्म बदलल्याच्या ज्या काही बातम्या पसरत आहेत, त्या केवळ अफवा आणि चर्चांवर आधारित आहेत. अधिकृत पुष्टीशिवाय यावर विश्वास ठेवणं घाईचं ठरेल.

दरम्यान, या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याला राज ठाकरे, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्यासह दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री एली अवराम हजर होत्या. याशिवाय मुलगी इरा, जावई नुपूर शिखरे, मुलगा जुनैद आणि अंबानी कुटुंबातील काही सदस्यही या आनंदाच्या क्षणी सहभागी झाले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही