🕒 1 min read
लखनऊ: अयोध्येतील राम मंदिरातील दानप्रकरणाची (Ram Mandir Donation Theft) चौकशी सुरू असतानाच आणखी एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मीनारायण (IAS Laxminarayan) यांनी आपण मंदिराला अर्पण केलेले सुमारे 5 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे श्रीरामचरितमानस गायब झाल्याचा दावा केला. या विधानानंतर या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू झाली असून, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
राम मंदिरातील दान व्यवस्थापनासंदर्भात आधीच विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान मंदिरातील दान मोजण्याचे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत अचानक झालेल्या बदलाची माहिती समोर आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. अशातच लक्ष्मीनारायण (Laxminarayan) यांच्या दाव्यामुळे या वादाला आणखी एक नवे वळण मिळाले.
लक्ष्मीनारायण यांनी दावा केला की, त्यांनी सोन्याचा वापर करून सुमारे 5 कोटी रुपये खर्चून तयार केलेले श्रीरामचरितमानस राम मंदिराला भेट म्हणून दिले होते. मात्र, नंतर त्याचा कोणताही मागोवा मिळत नसल्याने तो ग्रंथ गायब झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
या आरोपांनंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विशेष निमंत्रित सदस्य गोपाल राव (Gopal Rao) यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीनारायण यांनी अर्पण केलेले सोन्याचे श्रीरामचरितमानस पूर्णपणे सुरक्षित आहे. दान स्वीकारल्यानंतर भाविकाच्या इच्छेनुसार तो पवित्र ग्रंथ काही काळ श्रीरामललाच्या गाभाऱ्यात सन्मानपूर्वक ठेवण्यात आला होता. यानंतर मंदिराच्या नियमानुसार हा ग्रंथ मंदिर परिसरातील गुरुमंडपातील दागिन्यांच्या तिजोरीत हलवण्यात आला. या तिजोरीत इतरही मौल्यवान धार्मिक वस्तू सुरक्षित ठेवण्यात आल्या असून, संबंधित ग्रंथाची नोंद मंदिराच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे, असे गोपाल राव यांनी स्पष्ट केले.
गोपाल राव यांनी पुढे सांगितले की, लक्ष्मीनारायण यांना इच्छेनुसार मंदिरात येऊन हा ग्रंथ प्रत्यक्ष पाहण्याची संपूर्ण मुभा आहे. त्यामुळे ग्रंथ गायब झाल्याचा दावा वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रस्टच्या या स्पष्टीकरणानंतर सोन्याच्या रामचरितमानसाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, संबंधित ग्रंथ सुरक्षित असून त्याची अधिकृत नोंदही उपलब्ध आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Cloudburst Warning! नाशिकमध्ये मेजर ढगफुटीची शक्यता! मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला गंभीर इशारा
- ‘याच विकासामुळे उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये’; राऊतांची शिंदेंवर टीका
- ‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












