Share

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Published On: 

Maharashtra Rain Alert: आज वादळी पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सूनने जोर पकडण्यास सुरुवात केली असून राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होत आहे. काही भागांत पावसाची गती मंद असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत मान्सून मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्यासाठी वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

चंद्रपूर, गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. तर अकोला, भंडारा, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणातही पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतही वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागांसाठी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाने संभाजीनगर, मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही