🕒 1 min read
बिग बॉसच्या घरात (Bigg Boss OTT) २४ तास कॅमेऱ्यांसमोर वावरणारे स्पर्धक कॅमेऱ्यामागे नक्की काय करतात? त्यांना खरोखरच दारू आणि सिगारेट पुरवली जाते का? हे प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलेच असतील ना?
या सगळ्या चर्चांना आणि अफवांना आता थेट ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिनेच पूर्णविराम दिला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने बिग बॉसच्या घरातील अनेक छुप्या रहस्यांवरून पडदा उठवला असून, स्पर्धकांच्या इंटिमेट होण्यापासून ते त्यांच्या व्यसनांपर्यंत अनेक गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं आहे.
Bigg Boss OTT Secrets
दिव्याने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरात साधं टोमॅटो केचअप किंवा कॉफी मिळणंही मुश्किल असतं. खाण्यापिण्याच्या बाबतीत मेकर्सचे अत्यंत कडक नियम असतात आणि छोट्या गोष्टीही तिथे मोठ्या वाटू लागतात. पण आश्चर्य म्हणजे, सिगारेटच्या बाबतीत चित्र अगदी वेगळं आहे.
मेकर्स सिगारेटला ‘लक्झरी’ न मानता ती स्पर्धकांना अगदी सहज उपलब्ध करून देतात. सकाळी उठल्यावर चक्क स्पर्धकांना त्यांच्या आवडीच्या ब्रँडची सिगारेट विचारून दिली जाते, असा मोठा गौप्यस्फोट तिने केला.
दुसरीकडे, बिग बॉसच्या घरात दारू पार्ट्या चालतात, ही निव्वळ अफवा असल्याचं तिने स्पष्ट केलं. “घरात कोणालाही कधीच दारू दिली जात नाही,” असं दिव्याने ठामपणे सांगितलं. घरातील प्रायव्हसी आणि इंटिमेट होण्याच्या प्रश्नावर बोलताना ती म्हणाली की, “कॅमेऱ्यासमोर जरी सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत नसल्या, तरी आतमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात.”
याव्यतिरिक्त, स्पर्धकांना स्वतःची कामे आणि ग्रूमिंग (जसे की वॅक्सिंग) स्वतःच करावे लागते. त्यासाठी बाहेरून कोणतीही मदत मिळत नाही, हेही तिने यावेळी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिपाली सय्यद बनल्या रुपाली चाकणकर, फर्स्ट लूक आला समोर; पण ‘भोंदू खरात’ कोण?
- रितेश देशमुख भडकला! सलमान अन् संजय दत्तच्या प्रश्नावर पत्रकाराला भर कार्यक्रमात सुनावलं
- अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला ‘अल्टीमेटम’! ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा, तर फुटीर खासदारांवरही संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












