Share

गणपतीपुळ्याच्या लाटांचा बिडकीनच्या तरुणांवर घाला; सुट्टीचा आनंद क्षणात हिरावला, चार जण अद्याप बेपत्ता

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बिडकीनचे ५ तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली असून एकाचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित चौघांसाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

Published On: 

Ganpatipule Drowning rescue operations for missing youths from Bidkin Sambhajinagar

रत्नागिरी (किरण काळे पाटील) – आनंदाची सहल काही क्षणांतच भीषण शोकांतिकेत बदलेल असं कोणाला वाटलं होतं? रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज शनिवारी सकाळी अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील १९ तरुणांचा गट सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे येथे आला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यातील आठ जण समुद्रात उतरले, पण लाटांचा अंदाज न आल्याने पाच जण खोल पाण्यात ओढले गेले.

गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्घटना: बिडकीन गावावर शोककळा, एकाचा मृतदेह जप्त

स्थानिक जीवरक्षकांनी तत्परता दाखवत तिघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र पाच तरुणांचा घात झाला. समुद्रात बुडालेल्यांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे.

दुपारी चार वाजेच्या सुमारास मालगुंड किनाऱ्यावर प्रेम दीपक आदमाने या तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. प्रशासनाने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. ही बातमी घरात पोहोचताच आई-वडिलांनी फोडलेला टाहो काळजाला घर पाडणारा होता.

दुसरीकडे, समुद्रातील (Ganpatipule) प्रचंड करंट आणि उसळणाऱ्या लाटांमुळे उर्वरित चौघांचा शोध घेण्यात मोठे अडथळे येत आहेत. स्थानिक मच्छीमार, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक बोटींच्या साहाय्याने समुद्राचा कोपरान् कोपरा धुंडाळत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही