🕒 1 min read
Operation Tiger: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला लागलेली ही गळती आता केवळ चर्चा पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्याची इन्साइड स्टोरीचे पुरावे समोर यायला लागले आहेत.
ठाकरे गटाचे एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदार पक्षाचा व्हीप धुडकावून आणि थेट बंडखोरी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या बंडाच्या पार्श्वभूमीवर, आता ‘ऑपरेशन टायगर’चा पहिला अत्यंत महत्त्वाचा आणि एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे.
बंडखोर खासदारांचा अज्ञात मुक्काम आणि पहिला फोटो
ठाकरे गटाची बैठक धुडकावून ६ फुटीर खासदार नॉटरीचेबल झाले. अखेर Operation Tiger यशस्वी झाल्याच्या चर्चा झाल्या. पण पक्षांतर केल्यानंतर हे सर्व बंडखोर खासदार नेमके कुठे आहेत? त्यांचा मुक्काम कुठे आहे? आणि त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे? याबाबत राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नव्हती. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती.
परंतु, आज २० जून रोजी सकाळी या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. या बंडखोर खासदारांचा एक अतिशय महत्त्वाचा फोटो सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सर्व बंडखोर खासदार एका अतिशय आलिशान आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र बसलेले दिसत आहेत. त्यांचा हा ‘शाही थाट’ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हा फोटो नेमका कधी काढण्यात आला आहे आणि कोणत्या वेळेचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा पुष्टी समोर आलेली नाही.
खासदारांचा प्रवास कसा झाला?
दिल्लीत सर्व कायदेशीर आणि राजकीय चाचपणी पूर्ण झाल्यानंतर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे अचानक पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, उर्वरित पाचही खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव आणि राजकीय दबाव टाळण्यासाठी तातडीने अज्ञातस्थळी हलवण्यात आले होते. हे खासदार नेमके कुठे गेले, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व बंडखोर खासदार दिल्लीतील लीला हॉटेल मध्ये होते, त्यानंतर त्यांना राजस्थानमधील जयपूर येथील एका प्रसिद्ध आणि सुरक्षित आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर रात्री मुंबईमध्ये आणले जाण्याच्या बातम्या होत्या. आता समोर आलेल्या नव्या फोटोमध्ये खासदार संजय देशमुख, संजय दिना पाटील आणि नागेश आष्टीकर हे एका आलिशान हॉटेलमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. (Operation Tiger Full Details)
६ खासदारांनी बंडखोरीचे काय कारण दिले?
या खासदारांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र का केला, याबाबत आता अंतर्गत कारणे समोर येत आहेत. बंडखोर खासदारांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि मतदारसंघातील विकास कामांसाठी मिळणारा निधी ही या बंडामागील मुख्य कारणे आहेत. सत्ता नसल्यामुळे मतदारसंघात रस्ते, पूल आणि पाणी पुरवठा योजनांसारखी महत्त्वाची कामे रखडली होती. वारंवार प्रस्ताव देऊनही निधी मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. ठाकरेंच नेतृत्व आणि आदित्य ठाकरेही वेळ देत नसल्याची कुणकुण समोर आली आहे. भविष्यातील आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा दबाव असल्यामुळेच या खासदारांनी महायुती सरकारसोबत जाण्याचा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार?
शिवसेनेच्या वर्धापन दिनीच ठाकरे गटाला बसलेला हा दुसरा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी आमदारांनी बंड केले होते आणि आता थेट खासदारांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत. दुसरीकडे, शिंदे गटातील नेते आमदार संतोष बांगर आणि रामदास कदम यांनी दावा केला आहे की, हे केवळ ६ खासदारांपुरते मर्यादित नसून, आगामी काळात ठाकरे गटाचे आणखी १४ आमदार आणि १ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, समोर आलेल्या या फोटोमध्ये नेत्यांचा शाही थाट दिसत असला, तरी सध्या काही खासदारांचे वैयक्तिक मोबाईल फोन ‘नॉट रिचेबल’ येत आहेत. ते सध्या कोणत्या हॉटेलमध्ये आहेत किंवा कोठे आहेत याची माहिती अजून समोर आलेली नाही. ठाकरे गटाने ऑपरेशन तुडवा जाहीर केल्यामुळे, खासदारांच्या सुरक्षेचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ठाकरे गटाकडून होणारा संभाव्य रोष आणि राजकीय संपर्क टाळण्यासाठीच ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते. हा फोटो समोर आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- NEET विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बसेस, पण मुंबईत बेस्ट संपाचा अडथळा
- भक्तीस्थळी मृत्यूचा थरार! निर्माणाधीन मंदिर कोसळून 7 भाविकांचा बळी
- शिंदे गटात खळबळ! माजी नगरसेवकासह 7 जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












