Share

कान्समध्ये आराध्याने ऐश्वर्याला टाकलं मागे; ‘त्या’ एका लुकने इंटरनेटवर उडवली खळबळ!

कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायपेक्षा लेक आराध्या बच्चननेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या रेड गाऊन लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Published On: 

Aishwarya Rai Cannes 2026: आराध्याचीच सर्वत्र चर्चा!

बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात कधी कोण लाइमलाइट चोरून नेईल, याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय आता थेट कान्समधून आलाय! निमित्त ठरलंय ते बहुचर्चित ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ (Cannes Film Festival). दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ब्युटी क्वीन’ ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चनने आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली आहे.

पण थांबा… यंदाची खरी चर्चा ऐश्वर्याची नाही, तर चक्क तिची लेक आराध्या बच्चनची होत आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नुकत्याच कान्समधील एका ग्रँड डिनर पार्टीमध्ये एकत्र पोहोचल्या. याठिकाणी आराध्याने सॅटिन रेड रंगाचा चमकदार गाऊन आणि केप परिधान केला होता.

Aishwarya Rai Cannes 2026

Aishwarya Rai in Cannes हा विषय नेहमीच ट्रेंडिंग असतो, पण यंदा आराध्याच्या या जबरदस्त लुकने सगळ्यांचेच डोळे दिपवले आहेत. उंची आणि सौंदर्याच्या बाबतीत आराध्याने थेट आपल्या आईलाच टक्कर दिल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

नेटकरी तर ऐश्वर्याला विसरून आराध्याच्याच फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत, आणि या माय-लेकींचे फोटो इंटरनेटवर अक्षरशः व्हायरल झाले आहेत.

दुसरीकडे, स्वतः ऐश्वर्यानेही ‘फ्रेंच रिवेरा’च्या नयनरम्य पार्श्वभूमीवर आपल्या लुकचा जलवा दाखवला. तिने बेबी पिंक रंगाचा ड्रेप्ड आउटफिट आणि फ्लोइंग केप स्लीव्स घालून एक मनमोहक फोटोशूट केलं.

नेहमीप्रमाणेच तिने आपले केस मोकळे सोडत ग्लॉसी मेकअपला पसंती दिली होती. तर कान्सच्या रेड कार्पेटवरील पहिल्या वहिल्या एंट्रीसाठी तिने रॉयल ब्लू रंगाचा शिमरी बॉडीकॉन गाऊन निवडला होता, ज्यावर तिने अगदी मोजकेच दागिने घातले होते.

पण, ऐश्वर्याने कितीही भारी ड्रेसेस घातले असले तरी, या डिनर पार्टीत आराध्यानेच खऱ्या अर्थाने महफील लुटली, असंच आता सगळे म्हणत आहेत!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install