🕒 1 min read
सध्या सोशल मीडियावर एकाच पक्षाची सर्वाधिक चर्चा रंगलीये, ती म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janata Party). राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आलाय. तरुणाईच्या या नव्या ट्रेंडने भल्याभल्या राजकीय पक्षांची झोप उडवली आहे.
इन्स्टाग्रामवर चक्क भाजपलाही (८७ लाख फॉलोअर्स) मागे टाकत या पार्टीने तब्बल १ कोटी १३ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले आहेत. आता या डिजिटल सटायर मुव्हमेंटला मराठमोळे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी थेट पाठिंबा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
Cockroach Janata Party
हेमंत ढोमे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून Cockroach Janata Party चा एक स्क्रीनशॉट शेअर करत आपलं सडेतोड मत मांडलं. या पोस्टमध्ये ते म्हणाले, “कॅाजपा’ला आत्ताच विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची कीव येते… एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, ही सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे.”
या राजकीय आंदोलनाचं पुढे काय होईल हे माहीत नसलं तरी, लोकशाहीत पर्याय महत्त्वाचा आहे आणि लोक प्रश्न विचारत आहेत यावर ढोमे यांनी जोर दिला.
तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की ही पार्टी अचानक आली कुठून? तर, देशातील वाढती बेरोजगारी आणि परीक्षांमधील घोटाळ्यांवर आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातील अभिजित दिपके या तरुणाने १६ मे २०२६ रोजी या उपरोधिक चळवळीची सुरुवात केली.
त्याआधी १५ मे २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनावट पदव्या घेणाऱ्यांबद्दल बोलताना ‘कॉकरोच’ असा शब्द वापरला होता. त्याचाच निषेध म्हणून या पक्षाची स्थापना करण्यात आली.
स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट आणि ‘लेझी’ (आळशी) म्हणवणाऱ्या या पार्टीला आता देशभरातून प्रतिसाद मिळतोय. दिया मिर्झा, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा यांच्यासारख्या बड्या सेलिब्रिटींनी या पेजला फॉलो केल्याने हा ट्रेंड आता शिगेला पोहोचला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!
- तृषा कृष्णनची ‘ती’ पोस्ट आणि पहिल्यांदाच घेतलं ‘विजय’चं नाव; ‘त्या’ एका शब्दाने सोशल मीडियावर खळबळ!
- ऋषभ पंतचे उपकर्णधारपद शुबमन गिलमुळे गेले? बहिणीच्या ‘त्या’ एका लाईकने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










