Share

Border 2 : जावेद अख्तर भडकले, पण सोनू निगमने एका वाक्यात जिंकलं मन; म्हणाला ‘हे गाणं म्हणजे…’

‘बॉर्डर 2’ मधील गाण्यावरून जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर आता सोनू निगमने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.

Published On: 

Border 2 Controversy: जावेद अख्तरांच्या टीकेला सोनू निगमचं उत्तर!

बॉलिवूडमध्ये जुन्या गाण्यांचे रिमेक बनवणं हा काही नवीन प्रकार नाही, पण जेव्हा विषय ‘बॉर्डर’ सारख्या सिनेमाचा असतो, तेव्हा वाद हा होणारच! सध्या असंच काहीसं घडलंय ‘बॉर्डर 2’ (Border 2) च्या गाण्यावरुन. १९९७ मध्ये आलेलं ‘संदेसे आते हैं’ हे गाणं आजही अंगावर काटा आणतं. आता २०२६ मध्ये ‘बॉर्डर 2’ रिलीजसाठी सज्ज असताना, या गाण्यावरुन नॉस्टॅल्जिया विरुद्ध ओरिजिनॅलिटी असा सामना रंगलाय.

या वादात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली होती. जुन्या क्लासिक गाण्यांना नवं रूप देण्याच्या प्रकारावर त्यांनी सडकून टीका केली आहे. याला त्यांनी चक्क ‘बौद्धिक आणि रचनात्मक दिवाळखोरी’ म्हटलंय. सूत्रांनुसार, ‘बॉर्डर 2’ साठी या गाण्याचे शब्द पुन्हा लिहिण्यास जावेद अख्तर यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या मते, ओरिजिनल कलाकृतीला हात लावणे योग्य नाही.

Border 2 Controversy

आता यावर ओरिजिनल गायक सोनू निगम (Sonu Nigam) याने अतिशय मार्मिक आणि तोडीस तोड उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सोनूने जावेद साहेबांच्या मताचा आदर केला, पण आपली बाजूही मांडली. सोनू म्हणाला, “जावेद सर म्हणतायत ते एका अर्थी बरोबर आहे, जुनी गाणी पुन्हा आणणं चांगलं नाही. पण बॉर्डर हा एक सैनिक आहे आणि ‘संदेसे आते हैं’ हा त्या सैनिकाचा गणवेश (Uniform) आहे. या गाण्याशिवाय आपण बॉर्डर सिनेमाची कल्पनाच करू शकत नाही.”

या नव्या सिनेमात मनोज मुंतशिर यांचे शब्द असून अरिजीत सिंह, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांचेही आवाज आहेत. १९९७ ते २०२६ असा प्रदीर्घ प्रवास अनुभवणारा सोनू निगम म्हणतो, “जे युद्ध आपण काही वर्षांपूर्वी जिंकलो होतो, ते आपण पुन्हा जिंकणार आहोत.” सोनूच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत, पण जावेद अख्तर यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही