Share

कुलाब्यात उमेदवारांना धमकावलं? संजय राऊतांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर बरसले; म्हणाले, “हा तर रडीचा डाव…”

Rahul Narwekar dismisses Sanjay Raut’s allegations of threatening candidates in Colaba, calls it a fear of defeat.

Published On: 

Rahul Narwekar dismisses Sanjay Raut's allegations of threatening candidates in Colaba, calls it a fear of defeat.

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांमुळे मुंबईचं राजकारण चांगलंच तापलं आहे. कुलाबा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना विरोधकांना धमकावल्याचा आणि दमदाटी केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता यावर विधानसभा अध्यक्ष आणि आमदार राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी मौन सोडलं आहे. “पराभव समोर दिसू लागल्याने हा रडीचा डाव सुरू आहे,” अशा शब्दांत नार्वेकरांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

नेमकं काय घडलं?

कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे भाजपकडून नशीब आजमावत आहेत. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांना उमेदवारी अर्ज भरू दिले नाहीत, असा आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला होता.

“स्वतःच्या चुका लपवण्यासाठी माझ्यावर ( Rahul Narwekar ) आरोप नको” संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करताना नार्वेकर म्हणाले, “राऊतांकडून हीच अपेक्षा होती. मुळात ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारांना दुपारी १ वाजता एबी फॉर्म दिले. शेवटच्या क्षणी फॉर्म दिल्यावर धावपळ होणारच. वेळेत पोहोचता आलं नाही, यात माझा काय दोष? ५ वाजता जे केंद्राच्या आत होते, त्यांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. अगदी आमच्या भाजपच्या वॉर्ड २१२ च्या उमेदवारालाही वेळेत अर्ज भरता आला नाही. मी काय माझ्याच पक्षाचा अर्ज थांबवेन का?”

“मला सल्ले देण्याची गरज नाही” राहुल नार्वेकर यांनी यावेळी संजय राऊतांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, “मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून निष्पक्ष काम करतो आणि मतदारसंघात आमदार म्हणून काम करतो. मला माझं काम कसं करायचं, याचे सल्ले राऊतांनी देऊ नयेत. त्यांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत.”

कुलाब्यात बंडखोरी नाहीच कुलाबा विधानसभेत एकूण ६ जागा आहेत. काही कार्यकर्ते नाराज होते, पण त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला आहे. आता पक्षात कोणतीही बंडखोरी नाही, असं नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी स्पष्ट केलं.

घराणेशाहीच्या आरोपावर उत्तर मकरंद आणि हर्षिता नार्वेकर यांच्या उमेदवारीवरून होणाऱ्या घराणेशाहीच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. “हर्षिता आणि मकरंद हे मी पक्षात येण्याआधीपासून भाजपचे नगरसेवक आहेत आणि पक्षाचे काम करत आहेत. त्यांच्या कामाच्या जोरावरच संघटनेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. हर्षिता नार्वेकर वॉर्ड क्रमांक २२५ मधून लढत आहेत आणि तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी १२ हजारांच्या मताधिक्याने आम्ही जिंकू,” असा विश्वास नार्वेकरांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही