Share

ठाकरे-मनसे युतीत पेच; वॉर्ड ६७ मध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात, उद्याच्या निर्णयाकडे लक्ष

friendly fight or trouble? MNS and Shiv Sena (UBT) candidates face off in Mumbai’s Ward 67.

Published On: 

Raj Thackeray, Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र येत युतीची ( MNS Shiv Sena Alliance ) घोषणा केली. येत्या ५ तारखेपासून दोन्ही नेते सभांचा धडाका लावणार आहेत, असं चित्र असतानाच मुंबईतील एका वॉर्डने मात्र युतीचं टेन्शन वाढवलं आहे. जागावाटपाचा तिढा सुटल्याचा दावा केला जात असला तरी, अंधेरी पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक ६७ मध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या जागेवर ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार की ऐनवेळी कुणी माघार घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ६७ (अंधेरी पश्चिम) मध्ये महायुतीविरोधात एकच उमेदवार देण्याचं ठरलं होतं. मात्र, छाननी प्रक्रियेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, इथे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (UBT) या दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज कायम आहेत.

एकीकडे युतीचे गोडवे गायले जात असताना, या एका जागेवर दोन्ही पक्षांत समेट का घडला नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर उद्यापर्यंत तोडगा निघाला नाही, तर ही ‘मैत्रीपूर्ण लढत’ मतविभागणीला निमंत्रण देणारी ठरू शकते.

कोण आहेत आमनेसामने? या वॉर्डमधील लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

मनसेकडून : कुशल धुरी

ठाकरे गटाकडून : शरद जाधव

हे दोन्ही उमेदवार आपापल्या पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जातात. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. लढत फक्त दोघांमध्ये नाही, १२ उमेदवार रिंगणात! हा सामना फक्त ठाकरे आणि राज यांच्या उमेदवारांमध्ये नाही, तर इथे तिरंगी-चौंरगी लढत होणार आहे. या वॉर्डात एकूण १२ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

भाजप : दीपक कोतेकर

समाजवादी पार्टी : प्रकाश कोकरे

वंचित बहुजन आघाडी : पीर मोहम्मद शेख

भाजप आणि ‘वंचित’चे आव्हान असताना, मनसे आणि ठाकरे गटाची मते फुटली तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होऊ शकतो, अशी भीती राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

उद्याचा दिवस निर्णायक

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या (२ जानेवारी) शेवटची मुदत आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा नेमकी कोणाला सुटली आहे, हे उद्या स्पष्ट होईलच. ज्याच्या वाट्याला जागा आली असेल, त्याचा उमेदवार कायम राहील आणि दुसऱ्याला माघार घ्यावी लागेल. मात्र, जर दोघांनीही हट्ट धरला, तर ही युतीतील पहिली ‘ठिणगी’ ठरू शकते. त्यामुळे उद्या माघार कोण घेणार? की बंडखोरी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही