Share

Shreyas Talpade, आलोक नाथ यांना ‘ती’ जाहिरात भोवली, 9 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Shreyas Talpade । ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2’ मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ला आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्याही तो चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, पण एका वेगळ्याच कारणामुळे. श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांच्यावर तब्बल 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा … Read more

by MHD

Published On: 

FIR registered against Alok Nath Shreyas Talpade in Uttar Pradesh

Shreyas Talpade । ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2’ मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ला आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्याही तो चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, पण एका वेगळ्याच कारणामुळे.

श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ (Alok Nath) यांच्यावर तब्बल 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोघांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR registered) करण्यात आला आहे, यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 16 सप्टेंबर 2016 रोजी ‘ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ मध्य प्रदेशातील इंदूर इथं नोंदणीकृत असल्याचं सांगितले होते. गुंतवणूकदारांना यामध्ये मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांसाख्या योजनांच्या ऑफर देण्यात येत होत्या.

त्यामुळे चांगले व्याजदर मिळत असल्याने अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. परंतु लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून ही कंपनी अचानक गायब झाली आहे. या सोसायटीच्या गुंतवणूक योजनांचा प्रचार आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे या दोघांनीही केला असल्याने ते अडचणीत आले आहेत.

FIR registered against Alok Nath and Shreyas Talpade

दरम्यान, अभिनेता सोनू सूद देखील या संस्थेच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. या प्रकरणावरून बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रतिक्रियेकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही