Share

Rohit Sharma | रोहित शर्मा करणार टी-20 मध्ये पुनरागमन? पुन्हा होऊ शकतो टी-20 संघाचा कर्णधार

Rohit Sharma is expected to make a comeback in T20

Published On: 

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा:  टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 उपांत्य फेरीमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.

तेव्हापासून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटपासून दूर आहे. अशात रोहित शर्मा ( Rohit Sharma )  टी-20 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बीसीसीआयचे सचिव आणि निवड समितीचे निमंत्रक जय शाह दिल्लीत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Only seven months left for the T20 World Cup

भारतीय संघातील स्फोटक फलंदाज रोहित शर्मा  ( Rohit Sharma ) गेल्या वर्षापासून टी-20 क्रिकेटपासून दूर आहे. अशात टी-20 विश्वचषकासाठी फक्त सात महिने राहिले आहे.

याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय रोहित शर्माकडे  ( Rohit Sharma ) टी-20 संघाची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती.  परंतु, टी-20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता रोहित शर्मा  ( Rohit Sharma ) टी-20 संघामध्ये पुनरागमन करून कर्णधाराची जबाबदारी सांभाळू शकतो.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये रोहित शर्माने  ( Rohit Sharma )  जर भारतीय संघाचं कर्णधार पद सांभाळलं तर टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये संघाचा कर्णधार तोच असू शकतो.

मात्र, रोहित शर्मा ( Rohit Sharma )  जर या मताशी सहमत नसेल तर हे घडणार नाही. भारतीय संघाला लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहे.

या सामन्यांसाठी रोहित शर्माने जर भारतीय संघाचं कर्णधार पद स्वीकारलं नाही तर सूर्यकुमार यादव या सामन्यांसाठी टीम इंडियाचं नेतृत्व करेल, अशी चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही