Share

Maratha Reservation | हिंगोलीत भुजबळ-जरांगे येणार आमने-सामने; 26 नोव्हेंबरला होणार दोघांच्याही सभा

🕒 1 min readMaratha Reservation | हिंगोली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आमने-सामने आल्याचे दिसत आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी ( Maratha Reservation ) प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | हिंगोली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) आमने-सामने आल्याचे दिसत आहे.

राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी ( Maratha Reservation ) प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर जरांगे आणि भुजबळ राज्यामध्ये सभा घेताना दिसत आहे. अशात हिंगोली जिल्ह्यामध्ये या दोन्ही नेत्यांची एकाच दिवशी सभा होणार आहे. या सभेमध्ये दोन्ही नेते काय भूमिका मांडणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange’s meeting will be held in 110 acre ground

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात आमने-सामने येणार आहे. हिंगोली-परभणी रोडवरील दिग्रास कऱ्हाळे फाट्यावर 110 एकर मैदानात मनोज जरांगे ( Maratha Reservation ) यांची सभा पार पडणार आहे.

तर दुसरीकडे त्याच दिवशी हिंगोली येथील रामलीला मैदानावर ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडणार आहे. मंत्री छगन भुजबळ या मेळाव्याला संबोधित करणार आहे.

या दोन्ही सभानंतर मराठा ( Maratha Reservation ) आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे दोघेही आक्रमक झाले आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

परंतु, त्याआधी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद होताना दिसत आहे. अशात राज्य सरकार मराठ्यांना ( Maratha Reservation ) ओबीसीतून आरक्षण देणार का? याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!