Share

Manoj Jarange | मराठा तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका – मनोज जरांगे

🕒 1 min read Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. त्यांचं (Manoj Jarange) हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं आहे. अशात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. Related News for Youफडणवीस सरकारचा मोठा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Manoj Jarange | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी धडपड करत आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे.

त्यांचं (Manoj Jarange) हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं आहे. अशात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे.

अशात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजातील तरुणांना हात जोडून विनंती केली आहे. कुणीही आत्महत्या करू नये, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, “सरकारने जर 24 डिसेंबर पर्यंत आपल्याला आरक्षण दिलं नाही तर 24 डिसेंबरनंतर मोठं आंदोलन होणार आहे.

आपल्याला आजपासूनच त्याची तयारी करायची आहे. आंदोलन जिवंत राहून करा. यासाठी कुणीही आत्महत्या करू नका अशी माझी (Manoj Jarange)  मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे.

आत्महत्या करून काहीही मिळणार नाही. आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.”

पुढे बोलताना ते (Manoj Jarange) म्हणाले, “एक डिसेंबरपासून आपण सकाळी उपोषणाला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आपलं साखळी उपोषण सुरू राहिलं पाहिजे.

हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणावरून मी राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मात्र, आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मी जे काही करत आहे, ते मराठ्यांच्या मुलांसाठी करत आहे. त्यामुळे जे आमचं चांगलं होऊ देत नाही, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही