Share

Maratha Reservation | राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेच्या भेटीला; मराठा-ओबीसी वादानंतर सरसकट आरक्षण मिळणार कि नाही यावर चर्चा

🕒 1 min readMaratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू केलं होतं. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे काही दिवस आमरण उपोषण केलं. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून 9 व्या दिवशी जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं होतं.Related News for … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात आंदोलन सुरू केलं होतं.

याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे काही दिवस आमरण उपोषण केलं. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून 9 व्या दिवशी जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं होतं.

त्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला या मुद्द्यावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली. अशात या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

काल ही बैठक होणार होती. परंतु, काल ही बैठक टाळण्यात आली. अशात काल मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) ओबीसी समाज रस्त्यावर उतरला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही, अशी भूमिका ओबीसींनी स्पष्ट केली आहे. अशात आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

The OBC community opposed the demand of the Maratha community

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आला आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.

तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मराठ्यांच्या (Maratha Reservation) या मागणीला विरोध केला आहे. अशात या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.

आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथे पाच वाजता ही भेट होणार आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये अतुल सावे (Atul Save), उदय सामंत (Uday Samant), संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा समावेश असणार आहे.

ओबीसी आणि मराठा वादानंतर सरसकट मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार की नाही? या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!