Share

Maratha Reservation | मराठा आरक्षण आमच्यासाठी दुय्यम स्थानी; बच्चू कडूंच्या विधानानंतर मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. आज मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. याच … Read more

Published On: 

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे.

आज मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण आमच्यासाठी सध्या दुय्यम स्थानी असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Bacchu Kadu commented on Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना बच्चू कडू म्हणाले, “मराठा समाजाचा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या आमच्यासाठी दुय्यम स्थानी आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती आमच्यासाठी सध्या प्रथम स्थानी आहे. ते असतील तर आरक्षण मिळेल. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मनोज जरांगे एक प्रामाणिक आणि निस्वार्थ नेतृत्व आहे.

काल मी मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलो होतो. मी सरकार म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांची भेट घेतली. पाणी आणि उपचार घ्यावे, अशी मी त्यांना त्यावेळी विनंती केली.”

दरम्यान, मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. मराठा समाजाचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन हिंसक वळण घेत आहे. कारण राज्यात बहुतांश ठिकाणी आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ, घरफोडी होताना दिसत आहे.

अशात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असल्याच्या चर्चा सुरू आहे.

आज दुपारी 3.30 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान ते मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं त्यांच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही