🕒 1 min read
Manoj Jarange | जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत ढासळलेली असून त्यांना बोलताना सुद्धा त्रास होत आहे. अशात जीव गेला तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
त्याचबरोबर जरांगे यांनी औषध आणि सलाईन घेण्यास देखील नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन अत्यंत आक्रमक झाले आहे.
Manoj Jarange’s health deteriorated
मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे.
तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावात घेणार नाही, अशी भूमिका अनेक ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे. अशात मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावली आहे.
तर दुसरीकडे आज मराठा उपसमितीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का? मराठ्यांना आरक्षण देऊन शिंदे-फडणवीस सरकार मनोज जरांगे यांचा जीव वाचवणार का? अशा चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
Manoj Jarange sister commented on Maratha Reservation
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज उपोषण स्थळी त्यांची बहीण रेखा पाटील दाखल झाली आहे. यावेळी बोलत असताना त्या म्हणाल्या, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाने राज्य शासनाला चाळीस दिवसाचा वेळ दिला होता.
मात्र, यादरम्यान राज्य सरकारने काहीच केलं नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यांना पुरावे हवे होते. आता त्यांना ते देखील मिळाले आहे. मात्र, सरकारने माझ्या भावाचा जीव घ्यायचं ठरवलं आहे. सरकारने सगळं बंद करून माझ्या भावाचा जीव वाचवायला हवा.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | माझ्या भावाचा जीव वाचवा; मनोज जरांगेंच्या बहिणीची शिंदे-फडणवीसांना कळकळीची विनंती
- Maratha Reservation | मराठ्यांचे जीव गेल्यानंतर आमदारांना जाग आली? आज घेणार CM शिंदेंची भेट
- Weather Update | राज्यातील तापमानात घसरण सुरू, लागली थंडीची चाहूल
- BJP vs CONGRESS – ‘५० कोटी अन् मंत्रिपद…भाजपची काँग्रेस आमदारांना ऑफर’
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक; नेत्यांचं घराबाहेर पडणं झालं कठीण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











