Share

Nitin Gadkari | नितीन गडकरींचा जीवन प्रवास दर्शवणाऱ्या ‘गडकरी’ चित्रपटाचा टिझर प्रसिद्ध; पाहा व्हिडिओ

🕒 1 min readNitin Gadkari | टीम महाराष्ट्र देशा: नितीन गडकरी यांचा जीवन प्रवास दर्शवणारा ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एएम सिनेमा आणि अभिजीत मुजुमदार यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तर अक्षय देशमुख फिल्मने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं कथा पटकथा दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केलं आहे.Related News for … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nitin Gadkari | टीम महाराष्ट्र देशा: नितीन गडकरी यांचा जीवन प्रवास दर्शवणारा ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एएम सिनेमा आणि अभिजीत मुजुमदार यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तर अक्षय देशमुख फिल्मने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं कथा पटकथा दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केलं आहे.

त्याचबरोबर अनुराग राजन भुसारी आणि मिहीर फाटे यांनी या चित्रपटाचा सह-निर्माता म्हणून काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. तर नुकताच या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित झाला आहे.

Who will play the role of Nitin Gadkari?

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा जीवन प्रवास दाखवणाऱ्या ‘गडकरी’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं.

मात्र, त्यामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार आहे? याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती.

त्यानंतर गडकरी यांची भूमिका कोणता साकारणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. टिजरमध्ये देखील ही उत्सुकता कायम राहिली आहे.

The film ‘Gadkari’ is slated to release on October 27

“या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेल मी नितीन जयराम गडकरी”, या ओळीने या टीजरची सुरुवात झाली आहे.

या चित्रपटामध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांची भूमिका कोण साकारत आहे? याबद्दल आता प्रेक्षकांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रेक्षकांची ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. कारण ‘गडकरी’ हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 पासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!