Share

Rahul Narwekar | आमदार अपात्रतेबाबत घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Rahul Narwekar | मुंबई: आमदार अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर अचानक दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत त्यांनी घटना तज्ञांची चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ते तातडीने मुंबईला परत आले आहे. मुंबईला परतताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत … Read more

Published On: 

Rahul Narwekar | मुंबई: आमदार अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे.

त्यानंतर राहुल नार्वेकर अचानक दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत त्यांनी घटना तज्ञांची चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ते तातडीने मुंबईला परत आले आहे.

मुंबईला परतताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत मोठे संकेत दिले आहेत.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, “माझा दिल्ली दौरा अचानक ठरला नाही. हा दौरा पूर्वनियोजित होता. त्याचबरोबर या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या भेटीगाठी देखील आधीच ठरलेल्या होत्या.

या दौऱ्यादरम्यान मी कायदे तज्ञांची भेटून आमदारांच्या अपात्रतेबाबत चर्चा केली आहे. अपात्रतेचा कायदा हा इव्हॉल्विंग कायदा आहे. या कायद्यामध्ये सतत बदल होत असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मी कायदे तज्ञांची भेट घेतली.”

The Supreme Court had directed the hearing in a week – Rahul Narwekar

पुढे बोलताना ते (Rahul Narwekar) म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात सुनावणी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आमची एक सुनावणी झालेली असून दुसरी सुनावणी शेड्युल होती.

तर येत्या आठवड्यापासून आम्ही नियमित सुनावणी करणार आहोत. गरज पडल्यास या सुनावणीला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना बोलवू. संवैधानिक शिस्तीची योग्यरित्या अंमलबजावणी करून सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही